Pune News : पुण्यातील हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघाताबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना महिनाभर जेलमध्ये बसावे लागते. या प्रकरणात केवळ 12 ते 15 तासात जमीन मिळतोय याचे आश्चर्य वाटते. इतक्या कमी वेळेत जामीन कसाकाय मिळाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात रात्री हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातात मद्यधुंद कार चालकाने दोघांचा बळी घेतला. यानंतर पुणेकरांनी संबंधित कर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या कारचालकाला जामीन ही मंजूर झाला आहे. यावरुन सध्या वातावरण तापले असून पुणेकरांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. युगेंद्र पवार म्हणाले, अशा प्रकरणात काही लोकांना महिनाभर जेलमध्ये बसावं लागतं. मात्र काही लोकांना बारा-पंधरा तासांमध्ये जामीन मिळतोय, तो पण रविवारी. मला आश्चर्य वाटलंकी एवढ्या कमी वेळात कसा काय जामीन मिळाला.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, मी अजून तेवढा त्याच्यावरती विचार केलेला नाही. विधानसभा अजून खूप लांब आहे. लोकसभा तर आत्ताच झाली आहे. लोक चर्चा करत असतील, पण मी आता सध्या लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. उद्याचं आपण उद्या बघु, असे सांगत या प्रश्नाला बगल दिली.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.