

Pune Police News : अलीकडेच पुणे शहर पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलीस दलातही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आल्याने पोलीस प्रशासनात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, एकाच आदेशात तब्बल 30 पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) यांची नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासोबतच प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी काढलेल्या आदेशानुसार विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन नेतृत्व मिळणार असून, स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या बदल्यांमध्ये सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव एमआयडीसी, शिरूर, हवेली, यवत, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील वाढत्या जबाबदाऱ्या आणि विविध प्रलंबित प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यांमधील कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. एकाच वेळी 30 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी प्रशासकीय पुनर्रचना झाल्याची चर्चा सुरू आहे.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे: पोलीस अधिकाऱ्याचे नाव पद कोठून (जुने ठिकाण) कुठे (नवे ठिकाण)
दत्तात्रय किसन गुंड पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष जुन्नर पोलीस ठाणे
कुमार रामचंद्र कदम पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस ठाणे रांजगणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे
चंद्रशेखर मोहनराव यादव पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे शिक्रापूर पोलीस ठाणे
विनोद भगवान पाटील पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष शिरुर पोलीस ठाणे
सचिन दिनकर पाटील पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष लोणावळा शहर पोलीस ठाणे
राजेश नारायणराव रामाघरे पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे हवेली पोलीस ठाणे
संतोष वसंत तासगावकर पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा यवत पोलीस ठाणे
हेमंत गणपत शेडगे पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष दौंड पोलीस ठाणे
विजयमाला महादेव पवार पोलीस निरीक्षक,जिल्हा विशेष शाखा उरुळी कांचन पोलीस ठाणे
संतोष शामराव जाधव पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा राजगड पोलीस ठाणे
महादेव नारायण वाघमोडे पोलीस निरीक्षक, रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
संदेश अरुण केंजळे पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
वैशाली रावसाहेब पाटील पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे महिला कक्ष/भरोसा सेल
नारायण शिवाजी देशमुख पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे एफ.आर.ओ. पुणे ग्रामीण
नागनाथ गुरुसिध्द पाटील सहा. पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे नियंत्रण कक्ष
राजेश गणेश गवळी पोलीस निरीक्षक, राजगड पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग
निलेश पांडुरंग माने पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बारामती विभाग भोर पोलीस ठाणे
संतोष श्रीमत घोळवे पोलीस निरीक्षक टी.एम.सी. सासवड पोलीस ठाणे
रविंद्र दत्तात्रय पाटील पोलीस निरीक्षक, एफ.आर.ओ. जेजुरी पोलीस ठाणे
दिपक भाऊसाहेब वाघचौरे सहा. पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
नारायण विनायकराव पवार पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष बारामती तालुका पोलीस ठाणे
जिवन शांताराम मोहिते सहा. पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलीस ठाणे वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
सोमनाथ पांडुरंग शेंडगे सहा. पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष भिगवण पोलीस ठाणे
कुलदिप दत्तात्रय संकपाळ सहा. पोलीस निरीक्षक, स्था. गु. शाखा माळेगाव पोलीस ठाणे
महेश नामदेव मेश्राम पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा सायबर पोलीस ठाणे
गोपाळ बासू पवार पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा
महेश रामेश्वर स्वामी पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा, बारामती विभाग
दिपरतन गोरख गायकवाड पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे जिल्हा विशेष शाखा
विनोद जगन्नाथ महांगडे सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
विकास जगन्नाथ भुजबळ पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.