School Diwali Vacation : पुणे जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल; 2 नोव्हेंबर पासून नव्हे तर या तारखेपासून सुट्टी? शिक्षण विभागाचा नवा आदेश!

Pune school Diwali vacation date change : पुणे जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या तारखांमध्ये बदल झाला असून शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार सुट्टी कधीपासून सुरु होणार, जाणून घ्या.
Pune school Diwali vacation date change
Pune school Diwali vacation date change Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या कधीपासून सुरू होणार, यावरून निर्माण झालेला संभ्रम आता आणखी वाढला आहे. राज्याच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली असताना, पुणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांसाठी सुट्टीच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, आता ५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान शाळांना दिवाळीची सुट्टी राहणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सुधारित परिपत्रक जारी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांसाठी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता नव्या आदेशानुसार सुट्टीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी नेमकी कधीपासून सुरू होणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम चर्चेचा विषय ठरत आहे.

Pune school Diwali vacation date change
Sonia Gandhi : सोनिया गांधींची इन्स्टाग्रामवर एन्ट्री! पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केला ‘Belonging’ आत्मचरित्राचा फर्स्ट लूक व्हॉयरल! पाहा video!

राज्याचे शैक्षणिक कॅलेंडर वेगळे, जिल्ह्याचा आदेश वेगळा!

राज्याच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार, शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १५ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी नियोजित आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याने दोन्ही तारखांमधील फरक समोर आला आहे.

नव्या आदेशानुसार, संबंधित शाळांना ५ नोव्हेंबरपासून सुट्टी सुरू होऊन १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वसाधारण शैक्षणिक वेळापत्रकापेक्षा पुणे जिल्ह्यातील या शाळांच्या सुट्टीच्या तारखा वेगळ्या असणार आहेत.

शाळांना मनाप्रमाणे सुट्ट्या बदलता येतात का?

माध्यमिक शाळा संहितेनुसार, शाळांच्या वर्षभरातील सुट्ट्या आणि प्रत्यक्ष कामकाजाच्या दिवसांबाबत नियम आहेत. वर्षभरातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त नसाव्यात, तसेच किमान २३० दिवस शाळा भरली पाहिजे, अशी तरतूद असल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे सुट्टीच्या तारखांमध्ये बदल करताना शैक्षणिक वेळापत्रक आणि लागू नियमांचा विचार करणे आवश्यक आहे.

Pune school Diwali vacation date change
Raj Thackeray Documentary : 'डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या..!'; राज ठाकरेंच्या 'द फ्रेंडशिप फाइल्स' पोस्टने उडवली खळबळ! पाहा Video!

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सुधारित आदेशाची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांची दिवाळी सुट्टी आता २ नोव्हेंबरऐवजी ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सुधारित आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com