Pune Sugarcane Theft : पुण्यात नवाच प्रकार समोर! रातोरात 40 टन ऊस चोरीला; साखर महागताच चोरांनी शोधली नवीन शक्कल!

Pune Sugarcane Theft News : साखरेच्या दरात वाढ होत असतानाच पुण्यात रातोरात तब्बल 40 टन ऊस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
Pune sugarcane theft 40 tonnes
sugar price hike Maharashtra sugarcane theftSarkarnama
Published on
Updated on

Pune Sugarcane Theft News : सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याची चर्चा सुरू असतानाच पुण्याच्या हवेली तालुक्यातून एक भन्नाट चोरीचा प्रकार समोर आला आहे. सोनं, मोबाईल किंवा वाहनांची चोरी ऐकली असेल; मात्र पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊसच चोरीला गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, सात महिन्यांचा वाढलेला ऊस कापून चोरट्यांनी तब्बल ८८ हजार रुपयांचा ऊस लंपास केला. या प्रकरणाचा लोणीकंद पोलिसांनी छडा लावत दोन जणांना अटक केली आहे.

पुण्याजवळील हवेली तालुक्यातील आष्टापूर येथे हा प्रकार घडला. तक्रारदार अनिल नंदकुमार कामठे यांच्या कुटुंबाची गट क्रमांक ८२२ मध्ये शेती आहे. कामठे कुटुंबीय १९ ते २३ ऑगस्टदरम्यान मुंढवा येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील सात महिन्यांचा ऊस कापून नेला.

Pune sugarcane theft 40 tonnes
Nepal Floods : नेपाळमधील विनाशकारी महापुरामागे चीनचा हात? 'त्या' गंभीर आरोपांवर चीनचं मोठं वक्तव्य!

कुटुंबीय शेतात परतल्यानंतर ऊस गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता तब्बल अंदाजे ४० टन ऊस चोरीला गेल्याचे समोर आले. या ऊसाची किंमत सुमारे ८८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय २९, रा. आष्टापूर) याचे नाव समोर आले. त्याच्या सांगण्यावरून योगेश पोपट गव्हाणे (वय २५, रा. आष्टापूर) याने आपल्या कामगारांच्या मदतीने शेतातील ऊस तोडून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

Pune sugarcane theft 40 tonnes
Supreme Court : न्यायाधीशांवरच उगारला जाणार कारवाईचा बडगा? CJI सूर्यकांत यांच्या वक्तव्याने न्यायव्यवस्थेत खळबळ

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चोरीचा ऊस नेण्यासाठी वाहनांचा वापर झाला होता का, तसेच या चोरीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

साखरेचे दर वाढले म्हणून ऊस महागला आणि चोरट्यांनी थेट शेतच गाठले, अशी चर्चा आता आष्टापूर परिसरात रंगली आहे. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com