Pune Teachers Constituency : पुणे शिक्षक मतमोजणीत मोठा ट्विस्ट! भाजपच्या गावडेंची आघाडी कायम पण धाकधूक वाढली, दुसऱ्या फेरीत गणित बिघडणार?

Pune Teachers Constituency Result : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला कोटा गाठता आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार मतमोजणीच्या एलिमिनेशन फेऱ्या सुरू आहेत.
Pune Teachers Constituency Result
Pune Teachers Constituency ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 28 Oct : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी आघाडी कायम राखली आहे. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २५ हजार ७५६ मतांचा कोटा अद्याप कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आमदारकीचा फैसला आता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून असून, अंतिम निकालासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६५० मते मिळाली आहेत. शिवसेनेचे सचिन सानप ११ हजार ३८३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर दत्तात्रय सावंत १० हजार ४०१ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना ८ हजार ३९० मते मिळाली असून, ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

१९ उमेदवार बाद; दुसऱ्या पसंतीच्या मतांवर लक्ष

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला कोटा गाठता आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार मतमोजणीच्या एलिमिनेशन फेऱ्या सुरू आहेत. आतापर्यंत १९ उमेदवार बाद झाले असून, त्यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण निर्णायक ठरणार आहे.

Pune Teachers Constituency Result
MLC Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; विद्यमान आमदाराचा पराभव, पाचवेळा निवडून गेले होते विधानपरिषदेत

कौस्तुभ गावडे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेतली असली, तरी ही आघाडी विजयात रूपांतरित करण्यासाठी त्यांना आणखी किती मतांची गरज भासते आणि बाद झालेल्या उमेदवारांची मते कोणाच्या पारड्यात पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pune Teachers Constituency Result
Marathwadad Graduate Constituency Election : कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलता, तुम्हाला मत का द्यायचे? महायुतीच्या मातब्बर उमेदवाराला जाब विचारणाऱ्या चिठ्ठ्या मतपेटीत!

आघाडी कायम, पण विजयाचे गणित अद्याप बाकी

गावडे यांची आघाडी कायम असली, तरी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमुळे निकालाचे गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर बाजी कोण मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांनंतरच विजयाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com