Pune Toxic Liquor Case : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विषारी दारूने एक दोन नव्हे तर तब्बल 22 जणांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणाची दखल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी घेतली आहे.
या प्रकरणी काही पोलिसांना निलंबित देखील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण पोलिसांच्या आशीर्वादानेच असले अवैध दारू धंदे सुरू असतात हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे आता एकीकडे पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे 22 कुंटूंब उघड्यावर पडल्याचा आरोप आता केला जात आहे.
तर दुसरीकडे आरोपी योगेश वानखेडे अवघ्या काही हजारांच्या हव्यासापोटी दारूत मिथेनॉल मिसळले आणि ही दारू जीवघेणी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वानखेडे उरळी कांचनमधील राजू प्रजापतीकडून दारू खरेदी केली आणि ती वेगवेगळ्या गुत्त्यांवर विकायचा. मात्र, दारूचे प्रमाण दुप्पट करून जास्त पैसे मिळवण्यासाठी वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळले त्यामुळे ही दारू जीवघेणी बनल्याचं समोर आलं आहे.
29 एप्रिल 2026
29 एप्रिल 2026 बनावट आधारकार्डच्या मदतीनं वानखेडेनं 215 लीटर मिथेनॉल मागवलं. 215 लीटर मिथेनॉलसाठी वानखेडेने 17500 रुपये मोजले.
9 मे 2026
35 लीटरचे 5 ड्रम दारू 9 हजार 500 रुपयांना विकत घेतले.
23 मे 2026
आरोपी राजू प्रजापतीच्या उरळी कांचनमधील देशी हातभट्टीवर दारू बनवण्यासाठी तयारी सुरु केली 5 ड्रम दारूमध्ये 5 ड्रम पाणी मिसळून 10 ड्रम केले. त्यामध्ये निम्म्याहून अधिक मिथेनॉल टाकून 12 ड्रम तयार केले.
मिथेनॉलसाठी 17 हजार 500 आणि दारूसाठी 9 हजार 500 असा एकूण 27 हजार रुपये खर्च आरोपीला आला. त्यानंतर आरोपीने 2 हजार 800 रुपये प्रमाणे मिथेनॉल मिश्रित दारू तीन ठिकाणी विकली. या 12 ड्रम मिथेनॉल मिश्रित दारूचे त्याला 33 हजार 600 रुपये मिळाले. हा सर्व हिशेब केला असता मिथेनॉल मिसळून वानखेडेला 6 हजार 600 रुपयांचा फायदा झाला.
त्यामुळे अवघ्या साडेसहा हजारापायी 22 लोकांचा जीव गेल्याचं तपासातून समोर आलं आहे. तर वानखेडेनं मिथेनॉल मिश्रित दारूचे 5 कॅन फुगेवाडीतील गुरमीतसिंग विरखा याला. 6 कॅन हडपसरच्या आकाश जाधवला आणि एक कॅन दारू वानखेडेनं दापोडीतील इरफान उर्फ पप्पू कुरेशीला दिल्याची माहिती समोर आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.