

Pune News : पुण्यात नऊ महिन्यापूर्वीच वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले होते. हे हुंडाबळी प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते तर 6 मुख्य आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. अशास्वरूपाच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडा प्रथेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता पुण्यातील लोणीकंद परिसरातील वैष्णवी जामकर या विवाहितेने सासरच्या लोकांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे.
लोणीकंद परिसरातील वैष्णवी जामकर या विवाहीत तरुणीने सासरच्या लोकांकडून छळ करत सतत पैशाची मागणी होत असल्यामुळे जीवन संपवले आहे. घरातच ओढणीने गळफास घेत वैष्णवी जामकरने आत्महत्या केली. 8 महिन्यांपूर्वी वैष्णवीचे लग्न झाले होते. याप्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी वैष्णवीचा सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या आत्महत्याप्रकरणामुळे पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरण
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यूप्रकरण राज्यभरात चर्चेत आलं होतं. वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. 23 वर्षीय वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू 16 मे 2024 रोजी तिच्या सासरी झाला. त्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी आरोप केला होता की, लग्नावेळी 51 तोळे सोने, एक महागडी गाडी आणि चांदीची भांडी घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींनी आणखी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. शारीरिक छळ केल्याच आढळून आले होते. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते तर 6 मुख्य आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.