Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठ थोपटून घेताच काँग्रेसने केला सवाल; हे खासदार पुण्याचे की जबलपूरचे?

Pune railway News : महाराष्ट्रातील काही गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत असताना उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरूनच सोडल्या जात आहेत.
Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls Controversy
Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls ControversySarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदारांकडून देण्यात आली. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन 'अमृत भारत' रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मात्र, या घोषणेनंतर काँग्रेसने मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन 'अमृत भारत' रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून या संदर्भातील अधिकृत मंजुरी कळवली आहे.

Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls Controversy
Maharashtra Live News Update: 'त्या' सर्व शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार: महसूल मंत्री बावनकुळे

महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वे गाड्या वाढवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून फारशी मागणी नसलेली पुणे–जबलपूर रेल्वे सेवा सुरू करणारे केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे की जबलपूरचे? असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पुणे–जबलपूर विशेष रेल्वे सेवेला आमचा विरोध नाही. मात्र, पुणेकरांच्या व महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षित करून ही सेवा सुरू करण्याचा अट्टाहास का? यामागे कोणते राजकारण आहे? असे प्रश्न काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपस्थित केले आहेत.

Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls Controversy
Sanjay Jadhav News : ऑपरेशन टायगरची चर्चा, तरी ठाकरेंच्या खासदाराच्या भेटीगाठी सुरूच; रेल्वे प्रश्नासाठी मंत्र्यांना साकडे!

महाराष्ट्रातील काही गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत असताना उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरूनच सोडल्या जात आहेत. हा भेदभाव असून प्रवाशांसाठी त्रासदायक असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे–मुंबई, पुणे–नाशिक आणि पुणे–संभाजीनगर या मार्गांवर अधिक गाड्या सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे.

Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls Controversy
Sanjay Jadhav News : ऑपरेशन टायगरची चर्चा, तरी ठाकरेंच्या खासदाराच्या भेटीगाठी सुरूच; रेल्वे प्रश्नासाठी मंत्र्यांना साकडे!

त्यासोबतच पुणे–लोणावळा लोकल सेवा विस्कळीत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता, सुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याबाबतही प्रवाशांच्या तक्रारी कायम असल्याचे जोशी यांनी पत्रकात नमूद केले. मेट्रो असो किंवा रेल्वे, गेल्या काही वर्षांत पुणेकरांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Murlidhar Mohol in PMC Election, Pune BJP Candidates, PMC Polls Controversy
Maharashtra Politics: मोठी बातमी: महाराष्ट्राचं राजकारण लवकरच हादरणार, तब्बल 50 आमदार फुटण्याच्या तयारीत...; ठाकरेंच्या खासदारानं फोडली आतली बातमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com