Pune Water Cut : पुणेकरांनो, सणासुदीच्या काळात पाणीकपात होणार! १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

Irrigation Department : दसरा-दिवाळीच्या आनंदावर पाणीकपातीचे सावट निर्माण झाले आहे. दरमहा १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Corporation water supply 10%  Cut From October 15
Corporation water supply 10% Cut From October 15sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : नवरात्रोत्सव सुरू असतानाच पुणेकरांच्या दसरा-दिवाळीच्या आनंदावर पाणीकपातीचे सावट निर्माण झाले आहे. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता गृहीत धरून खडकवासला पाटबंधारे विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह औद्योगिक वसाहतींमध्ये १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत.

उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याने महापालिका प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहिले आहे.

विशेष म्हणजे, ऐन सणासुदीच्या काळात पाणी कपात लागू करायची कशी, असा प्रश्न पुणे महापालिका प्रशासनापुढे आहे. कपातीची अंमलबजावणी करावी लागल्यास आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्यायही प्रशासनाकडून विचाराधीन असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुणेकरांना दसरा-दिवाळीतच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार का, याकडे लक्ष लागले आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी ७ ऑक्टोबरला यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. राज्य शासनाच्या ५ ऑक्टोबरच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीवापरात किमान १० टक्के कपात करावी, पाणीगळती रोखावी आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवडसह हिंजवडी, कुरकुंभ आणि पिंपरी औद्योगिक वसाहतींनाही पाणीवापराचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

Corporation water supply 10%  Cut From October 15
Pune Graduate-Teacher Constituency Election : आचारसंहितेमध्ये शिलाई मशीन, अन्नधान्य वाटप भोवले; एमआयएम पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पुढील वर्षभराच्या पाण्याची चिंता

अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण, कालावधी आणि वितरण याबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यावर जलसंपदा विभागाने भर दिला आहे. दोन्ही महापालिकांनी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित राहील, अशा पद्धतीने पाणीवापराचे नियोजन करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

...तर महापालिका जबाबदार

पाणी कपात लागू न केल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणीवापरात कपात करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

शहरासाठी कपात, मग कालव्याचे काय?

एकीकडे पुणे शहरात १० टक्के पाणी कपातीचे आदेश दिले जात असताना दुसरीकडे खडकवासला कालवा पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश असताना शहरातील पाणी कपात आणि कालव्याद्वारे होणारे पाणीवाटप यांचा समन्वय कसा साधला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना शहरातील नागरिकांवरच कपातीचा भार पडणार का, याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः दसरा-दिवाळीच्या काळात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी कपात कशी आणि कोणत्या पद्धतीने लागू करायची, याबाबत पुणे महापालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Corporation water supply 10%  Cut From October 15
Pune Metro: मोठी बातमी: पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख ठरली? मोदींच्या हस्ते ३ नोव्हेंबरला शुभारंभाची चर्चा; १७ स्थानकांना हिरवा झेंडा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com