Pune Job Scam : धक्कादायक! पुण्यातील कंपनीने महिलेला थेट पोर्तुगालमध्ये विकलं; इंस्टाग्रामवर ओळख अन् 18 लाखाचं पॅकेज...

Pune woman trafficking case : पीडित महिला नोकरीच्या शोधात होती. डिसेंबर 2025 मध्ये तिला इंस्टाग्रामवर पुण्यातील विमाननगर परिसरातील ‘वी मायग्रेट’ या कन्सल्टन्सीची माहिती मिळाली. संबंधित एजन्सीशी संपर्क साधल्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
Pune woman trafficking case
Pune woman trafficking case: A Nagpur woman was allegedly trafficked to Portugal after being promised a high-paying job. Pune Police are probing the case.
Published on
Updated on

Pune human trafficking case : राज्यासह पुण्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या 28 वर्षीय महिलेला थेट पोर्तुगालमध्ये विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर महिलेने स्वतःची सुटका करून घेत भारतात परत येत पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटची माहिती मिळाली. या टोळीतील काही आरोपी पुण्यात, तर काही जण पोर्तुगालमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नोकरीच्या शोधात होती. डिसेंबर 2025 मध्ये तिला इंस्टाग्रामवर पुण्यातील विमाननगर परिसरातील ‘वी मायग्रेट’ या कन्सल्टन्सीची माहिती मिळाली. संबंधित एजन्सीशी संपर्क साधल्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या नोकरीसाठी दरमहा दीड लाख रुपये पगार आणि दिवसाला केवळ आठ तास काम असल्याचे सांगण्यात आले.

Pune woman trafficking case
Dharmendra Pradhan : "Gen Z ची दिशाभूल, मी पुन्हा येईन..." राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचं मोठं वक्तव्य

या आमिषाला बळी पडलेल्या महिलेने नोकरीच्या प्रक्रियेसाठी आरोपींना टप्प्याटप्प्याने तब्बल 11 लाख रुपये दिले. मात्र, पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिच्यासमोर वेगळेच वास्तव आले. आरोपींनी तिला पोर्तुगालमधील एका बिअर शॉपच्या मालकाकडे विकल्याचा आरोप आहे. बिअर शॉपमध्ये पोहोचल्यानंतर महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध काम करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

तिने विरोध केल्यानंतर संबंधित मालकाने, ‘तुला खरेदी करण्यासाठी भारतातील एजंट्सना पैसे दिले आहेत’, असे सांगितल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे हादरलेल्या महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याची माहिती दिली. पतीने तिला धीर देत तेथून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर महिलेने परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेत भारत गाठला.

Pune woman trafficking case
Savarkar Quiz Controversy : सावरकरांचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा उल्लेख; शालेय क्विझवरून राजकीय रणकंदन, शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

भारतामध्ये परतल्यानंतर पीडित महिलेने पुणे गुन्हे शाखेशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीच्या आधारे पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा भाटी, अनिलकुमार, अजहर शेख, वामसी, चैतन्य, हिम्मत सिंग आणि कपिल मिश्रा अशी आरोपींपैकी काहींची नावे समोर आली आहेत.

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुण-तरुणींना हेरून त्यांची फसवणूक आणि मानवी तस्करी केली जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com