Dharmendra Pradhan : "Gen Z ची दिशाभूल, मी पुन्हा येईन..." राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचं मोठं वक्तव्य

Dharmendra Pradhan On Resignation : "माझ्यासमोर त्यावेळी कोणतीही वैयक्तिक अडचण नव्हती. भारतात दरवर्षी किमान दोन कोटी मुलांचा जन्म होतो. गेल्या दहा वर्षांत सुमारे २० कोटी मुलं जन्माला आली आहेत. या तरुणांच्या काही आकांक्षा आहेत आणि भविष्यात ते भारताला ‘विश्वगुरू’ बनवतील."
Dharmendra Pradhan
Dharmendra PradhanSarkarnama
Published on
Updated on

Dharmendra Pradhan resignation statement : NEET पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं स्वरूप आल्यानंतर शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी तब्बल दोन आठवड्यांनंतर या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर प्रधान यांनी प्रथमच आपल्या राजीनाम्याबाबत आणि Gen Z विद्यार्थ्यांबाबत भाष्य केलं.

भुवनेश्वर येथील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, "Gen Z ही आपलीच मुलं आहेत. काही लोकांनी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला." आपल्यासाठी मंत्रीपद कधीही महत्त्वाचं नव्हतं, असं मोठं वक्तव्य प्रधान यांनी केलं.

ते म्हणाले, "माझ्यासमोर त्यावेळी कोणतीही वैयक्तिक अडचण नव्हती. भारतात दरवर्षी किमान दोन कोटी मुलांचा जन्म होतो. गेल्या दहा वर्षांत सुमारे २० कोटी मुलं जन्माला आली आहेत. या तरुणांच्या काही आकांक्षा आहेत आणि भविष्यात ते भारताला ‘विश्वगुरू’ बनवतील. माझ्यासाठी मंत्रिपद कधीही महत्त्वाचं नव्हतं; मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती."

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर दोन आठवड्यांनी प्रधान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्यांनी २५ जुलै रोजी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Dharmendra Pradhan
Teacher News: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! तक्रार समिती स्थापन, कोणत्या प्रकरणांवर होणार सुनावणी?

दरम्यान, रेराखोल येथे झालेल्या दुसऱ्या एका कार्यक्रमात प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक यांच्यावरही निशाणा साधला. बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे किंवा ‘गो बॅक’च्या घोषणांमुळे आपण अजिबात विचलित झालो नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Dharmendra Pradhan
Nashik Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक पुन्हा हादरलं! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अनेक घरांच्या भिंतींना तडे

विमानतळाजवळ बीजेडीच्या युवा आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत प्रधान म्हणाले की, "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला परत जाण्यास सांगितलं, तरी मी पुन्हा परत येईन." नवीन पटनायक यांनी आपल्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. तसेच, तरुणांना आपल्याविरोधातील आंदोलनात सहभागी करून घेतल्याचा आरोपही प्रधान यांनी बीजेडीवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com