Pune ZP Budget : अजितदादांच्या नावाने 3 नव्या योजना; पुणे जिल्हा परिषदेच्या 333 कोटींच्या बजेटमध्ये नेमकं काय?

Pune ZP approves a ₹333 crore budget : अंदाजपत्रकात जिल्हा परिषद निधीतून 'माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्यानगौरव पुरस्कार' योजना, 'लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम' आणि अजितदादा पवार कृषी समृद्धी प्रशिक्षण योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Pune ZP
Pune ZPsarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Jul : पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी अंदाजपत्रकाला सोमवारी भरलेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मूळ ३०१ कोटी या अंदाजपत्रकात ३२ कोटी रुपयांची वाढ करून आता एकूण ३३३ कोटी रुपयांचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेली विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधींचा छाप

तत्कालीन प्रशासक गजानन पाटील यांनी १७ मार्च २०२६ रोजी ३०१ कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, त्या वेळी जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात नसल्याने सदस्यांना आपल्या भागातील विकासकामांच्या गरजा मांडता आल्या नव्हती. १८ मार्च रोजी नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर, अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सर्व सदस्यांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. या सूचनांचा विचार करूनच हे सुधारित पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

कृषी, शिक्षण आणि नावीन्यपूर्ण योजनांवर भर

या पुरवणी अंदाजपत्रकात ग्रामीण भागातील डिजिटल आणि पायाभूत विकासाला गती देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देणे, सुधारित अवजारे वाटप करणे यांचा समावेश आहे. याशिवाय बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे ५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 'स्पेशल पर्पज व्हेईकल' स्थापन करण्यास आणि कान्हेवाडी चाकण येथे समुदाय बायोगॅस प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.

Pune ZP
PMRDA Projects : पुण्यातील 15 नगररचना योजना रद्द होणार? CM फडणवीसांच्या बैठकीत PMRDA ला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

जिल्हा परिषद शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर वाढवणे, इस्रो आणि नासा सारख्या संस्थांचे अभ्यास दौरे आयोजित करणे, सायन्स पार्क, मॉडेल शाळा आणि जिल्हा डेटा सेंटर उभारणे. ७५% अनुदानावर एकल महिलांना शेळ्यांचे वाटप किंवा कुक्कुटपालन साहित्याचे वितरण, 'घे भरारी', सावित्री कॅफे, आणि अंगणवाड्यांसाठी धान्यकोठीची सोय. प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, मॉडेल PHC, फिरते शॉपी योजना आणि औषधे-लसींची खरेदी.

Pune ZP
Kangana Ranaut : "'कॉक्रोच' म्हणवता आणि तसेच दिसता, वागता; विद्रूपपणा बघून अक्षरशः मळमळ..." : 'ते' रिल्स पाहून आंदोलनकर्त्यांवर कंगना रनौतची जहरी टीका

'अजितदादा' यांच्या नावे नवीन पुरस्कार व योजना

या अंदाजपत्रकात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा प्रभाव दिसून येत आहे. जिल्हा परिषद निधीतून 'माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्यानगौरव पुरस्कार' योजना, 'लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम' आणि अजितदादा पवार कृषी समृद्धी प्रशिक्षण योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, महिला, युवक, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या विकास योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com