Kangana Ranaut : "कॉक्रोच" म्हणवता आणि तसेच दिसता, वागता; विद्रूपपणा बघून अक्षरशः मळमळ..." : 'ते' रिल्स पाहून आंदोलनकर्त्यांवर कंगना रनौतची जहरी टीका

Kangana Ranaut on CJP Protest : कंगना रनौत यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तयार करण्यात आलेल्या रील्स आणि आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या आयुष्यात एका ठिकाणी इतकी विद्रूपता यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचं त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
Kangana Ranaut slams protesters
Kangana Ranaut slams protestersSarkarnama
Published on
Updated on

Kangana Ranaut cockroach remark: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर कंगना रनौत यांनी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत CJP च्या आंदोलनावर हल्लाबोल केला आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तयार करण्यात आलेल्या रील्स आणि आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या आयुष्यात एका ठिकाणी इतकी विद्रूपता यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचं त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

कंगना रनौत यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नेमकं काय?

कंगना रनौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की, "माझ्या आयुष्यात मी इतका विद्रूपपणा एकाच ठिकाणी कधीच पाहिला नव्हता. GenZ आंदोलनातील हे रील्स पाहून अक्षरशः मळमळ येते. त्यांची बोलण्याची पद्धत, वापरली जाणारी भाषा आणि प्रत्येक फ्रेममधील वर्तन अत्यंत धक्कादायक आणि अश्लाघ्य आहे.

Kangana Ranaut slams protesters
Karad Student Death : NEET तणावाचा आणखी एक बळी; कराडमधील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

भारत हा विविधतेने नटलेला, संस्कृती, सभ्यता आणि सौंदर्य जपणाऱ्या लोकांचा देश आहे. पण तुम्ही स्वतःलाच 'कॉकरोच' म्हणवता आणि तसेच दिसता व वागता. यात कोणताही विरोधाभास नाही. उलट तुम्ही तुमचा कचरा, घाण आणि विद्रूपपणा जगासमोर मांडत आहात. हे रील्स पाहून मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहे. आता मला थोडा 'डिजिटल डिटॉक्स' आणि मानसिक शांततेची गरज आहे.", असं कंगना यांनी म्हटलं आहे.

Kangana Ranaut slams protesters
PMRDA Projects : पुण्यातील 15 नगररचना योजना रद्द होणार? CM फडणवीसांच्या बैठकीत PMRDA ला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

त्यांच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे आता नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंगना यांनी याआधी २० जुलै रोजीही CJP आंदोलनावर टीका केली होती. विरोधकांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या होत्या, "लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला अशा प्रकारे झुकवता येत नाही. सरकारमध्ये कोणाला ठेवायचे किंवा कोणाला हटवायचे, हे ठरवण्याचा अधिकार विरोधकांना नाही.

शासन कसे चालवायचे, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे असतो. विरोधकांना सरकार चालवण्याची इतकीच इच्छा असेल, तर त्यांनी निवडणूक लढवून सत्तेत यावे.", असं त्यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com