Pune ZP : पुणे झेडपीतील सत्तेचा वाट ठरला; सभापती निवडीत भोर, मावळचा पत्ता कट? बारामती, इंदापूर, पुरंदरला ठेंगा...

Pune ZP Chairman Election NCP : पुणे जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्या सभापतीची निवड आज होणार आहे. कुठल्या तालुक्याला पद मिळणारी याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार इंदापूर, बारामतीला संधी मिळणार नाही.
Pune Zilla Parishad
Pune Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Pune News : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती आज निवडले जाणार आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार याबाबत सर्वत्र चर्चा असतानाच सभापती पद वाटपाचा एक फार्मूला समोर आला आहे.

विषय समित्यांच्या सभापती निवडीत मंत्र्यांचे तालुके असलेले बारामती व इंदापूर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा पुरंदर हे तीन तालुके वगळले जाण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतीच पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेतला असल्याचा सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याला देण्यात आले असून, उपाध्यक्षपद आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना सभापती पदापासून वगळण्यात येणार आहे. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघ हा भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश असलेला एकच मतदारसंघ आहे. त्यामुळे हा एकच मतदारसंघ ग्राह्य धरण्यात येणार आहे.

विषय समिती सभापती पदांच्या निवडीसाठी सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसारमावळ तालुक्याला एक सभापती पद देण्यात येईल. खेड व जुन्नर या दोन तालुक्यांपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ पद मिळणार आहे. शिरूर, हवेली या दोन तालुक्यांपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ सभापती पद मिळेल. तसेच मुळशी, भोर व वेल्हे या तीन तालुक्यांपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ सभापती पद देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Pune Zilla Parishad
Pune ZP News: सभापती निवडी आधीच वाद पेटला! ZP सदस्य केवळ ‘नावापुरते’; राष्ट्रवादीमध्ये नाराजी

जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडीचे संभाव्य सूत्र ठरले असले तरी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत बारामती विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी बारामतीला एक सभापती पद देण्याचा आग्रह धरला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा आग्रह मान्य केल्यास बारामती तालुक्याला एक सभापती पद दिले जाईल; परंतु त्यामुळे ऐनवेळी भोर विधानसभा मतदारसंघातील सभापती पद कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र केवळ भोरच नव्हे, तर मावळ तालुक्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही तालुक्यातील सभापती पद ऐनवेळी कट होण्याची शक्यता आहे.

सभापती पद सव्वा वर्षासाठी?

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांचा करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २४ जिल्हा परिषद सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असा यामागचा उद्देश असल्याचे उपस्थित आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगितले.

Pune Zilla Parishad
Pune ZP : राष्ट्रवादीच्या 5 आमदारांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नाकारले? खलाटे, खुटवड, इंगवलेंची संधी हुकली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com