

Uruli Kanchan News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून पुणे जिल्हा परिषदेच्या 15 इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.आता सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम,पक्षु-संवर्धन,महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापतींसाठी येत्या गुरुवारी (दि.2) रोजी निवड होणार आहे.हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणूक कार्यक्रम होणार आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड पाहता या विषय समित्यांवर निवड बिनविरोध अपेक्षित आहे. या सर्व विषय समित्यांवर मात्र राष्ट्रवादीचे 15 जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र इच्छा दर्शवल्याने त्यांनी मुंबईत देवगिरी निवास स्थानावर भेटीगाठीचे सत्र सुरू केले आहे.जिल्ह्यातील अडीच लोकसभा व दहा विधानसभा तसेच जातीय समिकरणांवर राष्ट्रवादीकडून या निवडी केल्या जाणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बारामती तर उपाध्यक्ष शिरुर लोकसभेसाठी गेल्याने उर्वरीत विधानसभा मतदारसंघ निहाय या निवडी होण्याचे संकेत आहेत. चार विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे पारडे जड झाले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, जुन्नर, खेड, हवेली आणि शिरूर या तालुक्यात हे पद जाणार असल्याचे निश्चित झाल्याने इच्छुकांची धावपळ सुरू आहे. या विषय समित्यांसाठी शांताराम इंगवले, करण खलाटे,विष्णू हिंगे,विक्रम खुटवड,जितेंद्र बडेकर,मोनिका हरगुडे,छाया तांबे ही प्रमुख नावे चर्चेत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच चार विषय समित्या मिळून साधारण साडे चारशे कोटींचे वार्षिक नियोजन तसेच पुणे जिल्हा विकास आराखडा मिळून अंदाजे चारशे कोटी असे भरभक्कम खर्चाचे नियोजन असल्याने, पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांनी अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्याकडे लॉबिंग सुरू केले आहे.
दरम्यान,शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेची फक्त दोनच पदे दिली जाणार आहेत.यापैकी याआधी या लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्याला उपाध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात एकच सभापतीपद दिले जाणार आहे.या एका पदासाठी शिरूर,हवेली,खेड आणि जुन्नर या चार तालुक्यात मोठी रस्सीखेच होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.