

Pune News : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यानंतर आता विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. 13 इच्छुकांनी जोरदार फील्डिंग सुरू केली असून त्यामुळे 2 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
कृषी, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या चार महत्त्वाच्या समित्यांसाठी अनेक इच्छुकांनी सक्रिय लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी 13 इच्छुकांनी जोरदार फील्डिंग लावली आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सभापतिपदाच्या शर्यतीत मुख्यत्वे शांताराम इंगवले, करण खलाटे, सागर मिसाळ, विष्णू हिंगे, विक्रम खुटवड, अंकिता पाटील, तुषार थोरात, श्रीमंत ढोले, जितेंद्र बढेकर, सुनील राऊत, छाया तांबे, कल्पना काळे आणि मोनिका हरगुडे यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व इच्छुकांनी आपल्या गटात तसेच वरिष्ठ नेत्यांकडे पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.
विशेषतः समाजकल्याण समितीचे सभापतिपद राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्याने यासाठीही अनेक दावेदार मैदानात उतरले आहेत. अलीकडेच जिल्हा परिषदेत नव्या सदस्यांची निवड झाल्याने गटबाजीचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे कोणता गट वरचढ ठरतो आणि कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष आहे.
पक्षांतर्गत समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांचा कल यावरच अंतिम निर्णय अवलंबून राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 2 एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक जिल्हा परिषदेतील पुढील सत्तासमीकरणांची दिशा ठरवणारी ठरू शकते. त्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली असून, निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.