Pune ZP Elections : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांची मोठी खेळी; भाजपची कोंडी; नव्या समीकरणामुळे पुन्हा सत्ता?

Pune ZP Elections Ajit Pawar : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांनी भाजपला रोखण्यासाठी स्मार्ट खेळी केली आहे. त्यामुळे मोठ्या पक्षाची ताकद त्यांना मिळणार आहे.
Pune ZP Elections Ajit Pawar
Pune ZP Elections Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Politics : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने मिशन लोटस राबवत संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्यासारखे मोठे नेते आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांना भाजप जड जाण्याच्या चर्चा होत्या. त्यात दोन्ही राष्ट्रवादीतील फूटीमुळे जिल्हा परिषद निवडणूकीत शरद पवारांचे उमेदवार अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात असण्याची शक्यता होती.

महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले. त्या प्रमाणे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील अजित पवार विशेष लक्ष देणार आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीची सत्ता पुणे जिल्हा परिषदेवर होती. यावेळी देखील पुन्हा सत्ता मिळण्यासाठी अजित पवारांनी मोठी खेळी खेळल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे,पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या त्या प्रमाणे जिल्हा परिषदेत देखील एकत्रच लढणार आहेत. मतांमधील फूट टाळण्यासाठी अजित पवारांनी ही खेळी खेळली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील याला हिरवा झेंडा दिल्याची चर्चा आहे.

Pune ZP Elections Ajit Pawar
Vada Pav Controversy : 'मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना तोंडात 'वडा-पाव' कोंबून बसलेले फडणवीस, ढोकळा-फाफडाचे कौतुक करतील.., रोजगार देणार कोठून?', ठाकरेंचा घणाघात

भाजपला पहिला दणका...

भाजपचे पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांची बुट्टे पाटील यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीत भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

नगरपंचायतीत ताकद दाखवली...

डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत अजित पवारांनी दाखवून दिले होते की पुणे जिल्ह्यात तेच 'दादा' आहेत. 17 नगरपंचायती पैकी तब्बल 10 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती. त्यामध्ये बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर या नगरपंयात, नगरपरिषदांचा समावेश होता.

Pune ZP Elections Ajit Pawar
Saroj Ahire Politics: ‘या’ प्रभागात सुरू आहे विधानसभेचा संघर्ष; उमेदवारांपेक्षा आमदार सरोज अहिरेंचीच प्रचारात आघाडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com