Teacher Attendance: शिक्षकांनो सावधान! शाळेबाहेरून हजेरीचा खेळ आता बंद; मोबाईल हजेरीवर ‘जिओफेन्सिंग’चा पहारा

Teacher Geofencing Attendance : पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये जिओफेन्सिंग आधारित ऑनलाइन हजेरी प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. शाळेच्या परिसरात पोहोचल्यानंतरच शिक्षकांना मोबाईलवर हजेरी नोंदवता येणार आहे.
Pune Teacher Geofencing Attendance
Pune Teacher Geofencing AttendanceSarkarnama
Published on
Updated on

Pune Teacher Attendance : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या नियमित उपस्थितीवर आता ‘जिओफेन्सिंग’च्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. शिक्षकांना शाळेच्या परिसरात पोहोचल्यानंतरच मोबाईलवरून हजेरी नोंदविता येईल. त्यामुळे शाळेपासून दूर राहून हजेरी लावण्याला आळा बसणार असून, शिक्षकांच्या उपस्थितीवर प्रशासनाचे अधिक प्रभावी नियंत्रण राहणार आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६९२ शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे दोन लाख दोन हजार १४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करणे प्रशासनासमोर आव्हान ठरते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या ‘जिओफेन्सिंग’वर आधारित ऑनलाइन हजेरी प्रणालीची प्रायोगिक अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकसमान हजेरी यंत्रणा तयार करण्याचा विचार सुरू असताना पुणे जिल्ह्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती अधिक काटेकोरपणे नोंदविण्यासाठी जिओफेन्सिंग आधारित हजेरी प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यात स्वतंत्र हजेरी यंत्रणा न ठेवता राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकच प्रणाली असावी, यासाठीही शासनस्तरावर चर्चा सुरू आहे.

Pune Teacher Geofencing Attendance
Maharashtra education department : शाळांच्या गुणवत्तेवर आता वरिष्ठांची नजर; अधिकारी थेट शाळेत जाऊन घेणार ‘ग्राउंड रिपोर्ट’

शाळेच्या परिसरात पोहोचल्यानंतरच हजेरी

जिओफेन्सिंग तंत्रज्ञानामुळे शाळेचा परिसर ‘भौगोलिक हद्द’ म्हणून निश्चित केला जाणार आहे. शिक्षक या परिसरात प्रत्यक्ष हजर झाल्यानंतरच त्यांना मोबाईलद्वारे हजेरी नोंदविता येईल. जीपीएस, बायोमेट्रिक आणि मोबाईल डेटावर आधारित ही प्रणाली काम करणार असल्याने शिक्षक शाळेपासून दूर राहून हजेरी लावण्याला आळा बसणार आहे.

विशेष म्हणजे, नेटवर्क उपलब्ध नसतानाही शिक्षकांना हजेरी नोंदविता येईल आणि नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर ती प्रणालीवर ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कमी नेटवर्क असलेल्या शाळांमधील शिक्षकांचीही गैरसोय होणार नाही.

कमी पटसंख्येच्या शाळांवरही लक्ष

ग्रामीण भागातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षक नियमित उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येतात. ऑनलाइन आणि लोकेशन आधारित हजेरीमुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ऑनलाइन हजेरी प्रणाली राबविण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्यभरासाठी जिओफेन्सिंगवर आधारित हजेरीचे मॉडेल आणि शिक्षण विभागाची सध्याची यंत्रणा यांचे एकत्रीकरण करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

Pune Teacher Geofencing Attendance
Nashik News : विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गावागावात जनसंपर्क; प्रत्यक्ष घरी भेट देत समुपदेशन

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ऑनलाइन हजेरी प्रणाली राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी जिओफेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत चर्चा सुरू असून, त्याचे एकत्रीकरण करून प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांची नियमित उपस्थिती वाढल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेलाही फायदा होईल. अस मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com