

Pune News: :खानवडी (ता. पुरंदर) येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद’ शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करणे आणि गैरवर्तन करणे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना महागात पडले आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही कारवाई केली.
गजानन पाटील यांनी याबाबत आज (गुरुवारी) आदेश दिले. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्याने शाळेला भेट दिल्यानंतर चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्याने जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. निलंबन कालावधीत लाखे यांचे मुख्यालय पंचायत समिती राजगड येथे निश्चित करण्यात आले असून, गट शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटलं आहे.
पाटील म्हणाले, "शाळेत जाऊन चुकीचे माहिती दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. संस्थेबद्दल बेजबाबदारपणे बोलणे योग्य नाही, अशाप्रकारे प्रशासकीय सेवेत असताना असले वर्तन संस्थेबद्दल गैरसमज पसरवणारे असल्याने ही कारवाई केली आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.