Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींवर कारवाईची पुण्यातून कोणी केली मागणी ?

Congress Political News : राहुल गांधी यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवशकता आहे.

Pune News : समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य नेहमीच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करीत असतात. ते करीत असलेल्या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजाबाबत आक्षेपार्ह विधाने करत आहेत. हिंदूंना हिंसक, द्वेषपूर्ण, खोटारडे असे लोकसभेत राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गांधी यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवशकता आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

या प्रकरणी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे निवृत्ती डोके, ओंकार दैने, दिलीप शेटे, नीलेश थोरात यांनी दिली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.

Rahul Gandhi
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या गांधी यांचे सभासदत्व तातडीने रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही हिंदू जनजागृती समितीने केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षाने यापूर्वी देखील 'भगवा आतंकवाद', हिंदू आतंकवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदू समाजाची नाहक बदनामी केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पहिलं पत्र; म्हणाले, ...तर तुम्हाला सहकार्य करायला मी तयार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com