Harshavardhan Sapkal : राहुल गांधींना 'पप्पू' म्हणणारे आता...; हर्षवर्धन सपकाळ यांचं मोदींबाबत वादग्रस्त विधान!

Harshawardhan Sapkal statement on Narendra Modi : राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणाऱ्यांवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Pune News: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २२ ऑगस्टला पुणे शहरात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याचे आयोजन काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी केले होते.

या कार्यक्रमांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर की टीका केली आहे. तसेच सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

Harshvardhan Sapkal
Nashik Guardian Minister : मोठी बातमी, नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची नियुक्ती; राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा, भुजबळ-भुसेंना डच्चू

या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, १२ वर्षांपूर्वी मोदी, मोदी आपला देश करत होता. आपल्या देशामध्ये राहुल गांधींसारखा एक प्रामाणिक माणूस जो आहे, त्याला बाजूला सारण्याचं एक कॅम्पेन सुरू होतं. त्या बिचाऱ्या आमच्या नेत्याला पप्पू, पप्पू म्हणत होते. १२ वर्षांनंतर आमचं सोनं तापून, तापून आता असं पीवर झालं, की आता पप्पू, पप्पू, म्हणून हिणवणारे आता 'पप्पा, पप्पा, त्या माणसाला म्हणायला लागतील, हा दिवस आता दूर नाही! असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुढे सकपाळ म्हणाले, 'आप के हर किसी के खाते में १५ लाख रुपये डालूंगा.' 'भाइयों और बहनों, न खाऊंगा, न खाने दूंगा.' 'भाइयों और बहनों, हर साल २ करोड रोजगार दूंगा. मैं नौकरियां दूंगा.' 'भाइयों और बहनों, किसान भाइयों, जो जिसका किसानी का जितना लागत मूल्य होगा, उससे डेढ़ गुना फसल को दाम दे दूंगा. महिलाओं को सुरक्षित रखूंगा. 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियान शुरू करूंगा.' अजून काय काय त्यांनी सांगितलं मात्र कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाहीत.

Harshvardhan Sapkal
Crime News : चित्रपटाची स्क्रीप्टही पडेल फिकी! पुण्यात स्वतःच्याच अपहरणाचा ड्रामा! तरुणाने रचलेला कट पाहून पोलीसही चक्रावले!

अशी आश्वासन देणारे मोदी हे थोतांड, खोटारडे अन् दलिंदर माणूस आहेत. आता हे दलिंदर माणूस या देशाचा पंतप्रधान झाले आहेत. असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. यावरून आता भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com