Supriya Sule On Thackery Brother : राज-उद्धव ठाकरेंची एकमेकाला टाळी देण्याची भाषा; सुप्रिया सुळेंना आनंद अन् खंतही

Supriya Sule reaction News : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule 3
Supriya Sule 3Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे राज ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही युतीसाठी हात पुढे केला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमचे भांडण शुल्लक आहे. एकत्र येणे आणि एकत्र राहणे हे कठीण गोष्ट आहे, असे वाटत नाही. हा माझा एकट्याचा विषय नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (supriya sule) म्हणाल्या, 'राज ठाकरे असे म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि माझ्यासाठी ही अत्यंत गोड आणि आनंदाची बातमी आहे. याबाबतची बातमी पाहिल्यानंतर मी दोघांनाही संपर्क साधला.

Supriya Sule 3
BJP Politics : भाजप पुणे शहराचा कारभारी बदलणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी चेहरा? कोल्हापूरकर घेणार निर्णय

आता माझ्या अंगावर काटा आलाय कारण ही इतक्या आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही तेवढेच प्रिय आहेत. बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Supriya Sule 3
Supriya Sule reaction : संग्राम थोपटेंच्या पक्ष बदलण्याची चर्चा; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या 'ते सोबत राहतील...'

महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मनाने त्यांचं स्वागत केले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule 3
Sangram Thopte News: मोठी बातमी! संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा; दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?

दोन्ही पवार एकत्र यावे का ? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची इच्छा अशी प्रतिक्रिया दिली. त्यासोबतच नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आजही आणि उद्याही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Supriya Sule 3
Sangram Thopate : तीन टर्म आमदार राहिलेल्या संग्राम थोपटेंना 'या' कारणामुळे सोडावी लागली काँग्रेस ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com