Raj Thackeray in Pune : महापालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरेंचंही मिशन 'लाडकी बहीण'? ; पुणे दौऱ्यात दिले संकेत!

MNS Mission Ladki Bahin : पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अधिक अधिक महिला मतदारांपर्यंत पोहचण्याच्या सूचना केल्या आहेत.
Raj Thackeray in Pune : महापालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरेंचंही मिशन 'लाडकी बहीण'? ; पुणे दौऱ्यात दिले संकेत!
Published on
Updated on

MNS and Pune Muncipal Election News : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची जादू पाहायला मिळाली. ऐन निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवली या लोकप्रिय योजनेमुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात महिलांनी महायुतीला मतदान केलं. त्यामुळे महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवता आला असल्याचं दिसून आलं.

यामुळे आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर या लाडक्या बहिणींना आपलंसं करणं आवश्यक असल्याचं सर्वच पक्षांना आता वाटू लागला आहे. त्या दृष्टीकोनातून राजकीय पक्ष पावलं टाकताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महिला मतदारांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा सूचना महिला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत

विधानसभा निवडणुकीनंतर(Vidhansabha Election) आता सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने एकला चलो ची भूमिका घेतली.मात्र मनसेच्या हाती अपयशत आलं. आता विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या शल्य विसरून मनसे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्याच्या तयारी लागली आहे.

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांना शहरातील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात येत आहे. मनसेचे नेते बाबू वागस्कर आणि मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रभाग निहाय माहिती जाणून घेत आहेत. तसेच महापालिकेच्या तयारी लागा अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देत आहेत.

Raj Thackeray in Pune : महापालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरेंचंही मिशन 'लाडकी बहीण'? ; पुणे दौऱ्यात दिले संकेत!
Devendra Fadnavis on Mungantiwar : मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले...

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने(MNS) खडकवासला हडपसर आणि कोथरूड या मतदारसंघात आपले उमेदवार दिले होते. या ठिकाणी मनसेला विजय साकारता आला नसला तरी मनसेच्या उमेदवारांनी चांगली मत घेतली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील प्रभागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संपर्क अभियान सुरू करण्याच्या सूचना या बैठकीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

आज राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी पुणे शहरातील महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मागील निवडणुकीमध्ये कशाप्रकारे महिलांनी काम केलं याबाबत राज ठाकरे यांनी जाणून घेतलं तसंच आगामी निवडणुकांमध्ये कशाप्रकारे महिला पदाधिकाऱ्यांनी काम करायचं आहे याबाबत सूचना केल्या.

Raj Thackeray in Pune : महापालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरेंचंही मिशन 'लाडकी बहीण'? ; पुणे दौऱ्यात दिले संकेत!
Sudhir Mungantiwar meet Gadkari : मंत्रिपदाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिलेले मुनगंटीवार गडकरींच्या भेटीनंतर म्हणतात, 'मी..'

50 टक्के मतदार या महिला असून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात. महिलांचे कौटुंबिक प्रश्न, मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा याबाबत महिलांच्या समस्या जाणून घेऊन मतदारांपर्यंत अधिकाधिक पोहचण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. जेणेकरून एका महिलेपर्यंत पोहचल्यानंतर एका कुटुंबापर्यंत पोहचता येतं, असं राज ठाकरे म्हणाले असल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com