Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन

Ratnakar Mahajan Passes Away : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या रत्नाकर महाजन यांच्या निधनाने काँग्रेसने ज्येष्ठ नेत्याला गमावले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
Ratnakar Mahajan Passes Away | Congress Leader
Ratnakar Mahajan Passes Away | Congress LeaderSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnakar Mahajan Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

रत्नाकर महाजन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक-राजकीय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. दीर्घकाळ काँग्रेस पक्षाशी जोडलेले राहून त्यांनी पक्षाची भूमिका विविध व्यासपीठांवर प्रभावीपणे मांडली. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

महाजन यांनी १९९९ ते २००९ या कालावधीत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. राज्याच्या विकास आणि नियोजनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी या पदावरून योगदान दिले.

Ratnakar Mahajan Passes Away | Congress Leader
Shahajibapu : शहाजीबापूंची पुन्हा भीष्मप्रतिज्ञा : 'मी विधान परिषद, राज्यसभा घेणार नाही; ज्याने मला निवडणुकीत पाडलं, त्याला पाडणारच...'

काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. पक्षाची विचारधारा, सामाजिक प्रश्न आणि राजकीय घडामोडी यावर सातत्याने भूमिका मांडण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Ratnakar Mahajan Passes Away | Congress Leader
Manoj Jarange Backfoot : अवास्तव मागण्या अन् निवडणुकीची भीती संपली; मनोज जरांगेंना शिंदे-फडणवीसांनी कसं एकाकी पाडलं? इनसाईड स्टोरी...

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या रत्नाकर महाजन यांच्या निधनाने काँग्रेसने ज्येष्ठ नेत्याला गमावले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com