Pranjal Khewalkar : खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात : प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री; रुपाली चाकणकरांचे खळबळजनक दावे

Pune Rave party News : खेवलकर यांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमधून 252 व्हिडीओ आणि 1749 नग्न तसेच अर्धनग्न फोटो जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये परराज्यातील मुलींवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
Rupali chakankar, pankaj khevalkar
Rupali chakankar, pankaj khevalkar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणाने आता नवा वळण घेतले असून, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खेवलकर यांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमधून 252 व्हिडीओ आणि 1749 नग्न तसेच अर्धनग्न फोटो जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये परराज्यातील मुलींवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

या प्रकरणात सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या पत्रात खेवलकर यांनी 28 वेळा हॉटेल रूम बुक करून परराज्यातील मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Rupali chakankar, pankaj khevalkar
Mumbai BJP President : ठाकरे बंधूंच्या युतीचा मोठा धसका; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार?

चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर, मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. “सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठा घोटाळा समोर येऊ शकतो,” असा दावा चाकणकर यांनी केला आहे.

Rupali chakankar, pankaj khevalkar
Eknath Shinde Meet Amit Shah : एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे मन मोकळं केलं! CM फडणवीसांच्या तक्रारीचा पाढा वाचला?

रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आले. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग केले आहे. 1 हजार 749 अधिक नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. 234 फोटो 29 व्हिडिओ अश्लील आहेत, नशा देऊन लैंगिक अत्याचार केलेले आहेत. हे फोटो, व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले आहेत.

Rupali chakankar, pankaj khevalkar
Devendra Fadanvis यांच्या भाषणावेळी गोंधळ, नक्की काय घडलं ? Mumbai News

यामध्ये मोलकरणीचे देखील फोटो आणि व्हिडिओ आहेत. अरुष नावाचा व्यक्ती मुली पुरवत होता. त्यांना सिनेमात काम करण्याचे आमिष दाखवले जात होते. मुलीचे शोषण करण्यात आले आहे. मानवी तस्करी विरोधी पथक या प्रकरणात काम करत आहे. महिलांची तस्करी करण्यात आलेली आहे. खेवलकर स्वतः अनेक व्हिडिओमध्ये असल्याचे, रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

Rupali chakankar, pankaj khevalkar
Rahul Gandhi News : अखेर राहुल गांधींनी घोळाचे पुरावे दिलेच; एका घरात 70 मतदार, महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीत मतदान…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com