Saam Exit Poll : कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटलांचं पारडं जड? मनसे, ठाकरे सेनेचा बदल घडणार यावर विश्वास...

Chandrakant Patil leads in Kothrud; MNS and Shiv Sena optimistic: विधानसभा मतदारसंघात भाजपाला मानणारा मोठा वर्ग आहे. गेला विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांना या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.
Kothrud Assembly constituency
Kothrud Assembly constituencySarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सर्वाधिक सेफ मतदारसंघ मानला जातो. अनेक वर्षांपासून कोथरूड विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवाराला विजयी करत आला आहे.

या विधानसभा मतदारसंघात भाजपाला मानणारा मोठा वर्ग आहे. गेला विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांना या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

चंद्रकांत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार देखील त्यावेळी करण्यात आला. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी चांगल्या मतांनी विजय साकारला. त्यांच्या विरोधात मनसेचे किशोर शिंदे हे निवडणूक रिंगणात होते. त्यांना आघाडीने पाठिंबा दिला होता.

यंदा चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मताधिक्य घेऊन आपण विजयी होऊ अशी अपेक्षा आहे. यांच्या अपेक्षाप्रमाणेच साम टीव्ही च्या एक्झिट पोल मध्ये त्यांचा विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kothrud Assembly constituency
Saam Exit Poll 2024 : खडकवासल्यात दोडकेंनी फटाके फोडले; मात्र विजयाची माळ तापकिरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

2014 ला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. मात्र 2019 ला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात अली. त्यामुळे या भागातील ब्राह्मण वर्ग काहीसा नाराज झालेले पाहायल मिळालं. तसेच स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार अशा प्रकारचा प्रचार देखील त्यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र हे दोन्ही मुद्दे यांच्या प्रचाराच्या केंद्रभागी नसल्याने चंद्रकांत पाटील यांचं पारडं कुठेतरी जड असल्याचं बोललं जात आहे.

Kothrud Assembly constituency
Pune Municipal Corporation: निकालापूर्वीच विजयी आमदारांचे टेन्शन महापालिकेने वाढवले; कार्यकर्त्यांना दिली तंबी

गेल्या पाच वर्षांमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सातत्याने कोथरूड येथे वास्तव्यास राहिले त्यांनी कोथरूड मधील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार देखील घेतल्याच पाहायला मिळालं. त्यामुळे ते स्थानिक नसल्याचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीमध्ये मागे पडला. तसेच या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार असणारे मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडल्याने उमेदवारीसाठी चंद्रकांत पाटील यांना जास्त संघर्ष देखील करावा लागला नाही.

भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उमेदवारीसाठी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केला असले तरी त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आल्याचा पाहायला मिळालं. दोन खासदार या विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्यासोबत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा या भागात फिरली त्याचा फायदा कुठेतरी चंद्रकांत पाटील यांना झाल्याचं पाहायला मिळालं.

Kothrud Assembly constituency
Pune Assembly Election : कांदा, लाडक्या बहिणी कोणाला हसविणार? पुणे जिल्ह्यात चुरस, उत्कंठा शिगेला

मतदानानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपण विक्रमी मतांनी विजयी होऊ असं विश्वास व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 75 हजार मतांचे मताधिक्य मिळालं होतं. त्याहून अधिक मताधिक्य आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसे कडून स्थानिक पातळीवर जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. त्यामुळे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना आपल्या विजयाचा विश्वास वाटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com