Eknath Shinde News: 'सचिन तेंडुलकर...' असे चौकार, षटकार सुरुच राहतील! सचिन अहिरांच्या उपसभापतीच्या अर्जानंतर एकनाथ शिंदेंचे संकेत

Eknath Shinde ON ‘Operation Tiger’: महायुतीकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

"गेल्या आठवड्यात 6 खासदारांना षटकार मारला आहे. असे चौकार, षटकार सुरुच राहतील," असे सांगत ऑपरेशन टायगर सुरुच राहिल, असे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या उल्लेख सचिन तेंडुलकर असा केला. 'तळागाळातील कार्यक्रर्ता म्हणून सचिन अहिर ओळखले जातात. त्यांनी आज महायुतीकडून उपसभापती म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. ते आल्यामुळे शिवसेनेची ताकद राज्यात वाढली आहे. कार्यकर्तांचा पक्ष म्हणून सचिन अहिर यांना न्याय मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आम्ही कोणत्याही प्रकारची तोडकाम करीत नाही. आम्ही जोडायला आलो आहे. लोकप्रतिनिधींना त्यांना मतदारसंघा विकास हवा आहे . त्यासाठी ते आमच्या सोबत येत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.सचिन अहिर यांच्यामुळे शिवसेनेना प्रवेशामुळे कायद्यांच्या काही अडचणी येणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.

शिवसेनेकडून विधानपरिषद सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर यांनी कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनाम पाठवला. त्यांनी राजीनामा दिल्याचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Eknath Shinde News
चार वेळा आमदार! आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा, आता शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज, कोण आहेत सचिन अहिर?

सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. “माननीय उद्धव ठाकरे साहेब” अशा शब्दांत सुरू होणाऱ्या या पत्रात त्यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सचिन अहिर हे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तसेच बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय कामगार सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

यासोबतच पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आणि प्रेम कायम राहावे, अशी भावनिक अपेक्षाही सचिन अहिर यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com