

Pune ZP Bhor News : पुणे जिल्हा परिषदेसाठी भोर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ फिप्टी-फिप्टी झाले आहे. याशिवाय भोर पंचायत समितीच्या 8 पैकी 4 जागेवर भाजपचे तर 4 जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शंकर मांडेकर व संग्राम थोपटे या आजी-माजी आमदारांमधील प्रतिष्ठेची लढत समसमान सुटली आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या वेळू-नसरापूर गटातून भाजपाचे पोपट सुके आणि उत्रौली-कारी गटातून भाजपाच्या स्वरूपा थोपटे विजयी झाल्या तर भोंगवली-कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड आणि भोलावडे-शिंदे गटातून राष्ट्रवादीचे प्रवीण जगदाळे विजयी झाले. विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे आपापल्या कार्यक्षेत्रात फटाक्यांची आतिषबाजी करून वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढल्या.
वेळू गणात भाजपच्या विजयी ज्ञानेश्वर पांगारे यांनी ठाकरे शिवसेनेच्या महेंद्र भोरडे यांचा 1534 मताधिक्याने पराभव केला. तर राष्ट्रवादीचे अशोक वाडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नसरापूर गणात राष्ट्रवादीच्या विजयी विशाल कोंडे यांनी भाजपच्या अमोल शिळीमकर यांचा 1255 मतांनी पराभव केला. तर ठाकरे शिवसेनेचे सचिन बांदल तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
भोंगवली गणात भाजपच्या विजयी रोहन बाठे यांनी अपक्ष अक्षय सोनवणे यांचा 498 मताधिक्याने पराभव केला. तर राष्ट्रवादीचे गणेश निगडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कामथडी गणात राष्ट्रवादीच्या विजयी तृप्ती खुटवड यांनी भाजपच्या नीता इंगुळकर यांचा 1806 मताधिक्याने पराभव केला. भोलावडे गणात राष्ट्रवादीच्या विजयी राजेश बोडके यांनी भाजपच्या काळूराम मळेकर यांचा 294 मतांनी पराभव केला.
शिंद गणात राष्ट्रवादीच्या विजयी मनीषा कंक यांनी भाजपच्या मनीषा पारठे यांचा 2540 मतांनी पराभव केला. उत्रौली गणातून भाजपच्या विजयी सुषमा चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या सुनीता वरे यांचा 3822 मतांनी पराभव केला. तर कारी गणात भाजपच्या विजयी गीता आंबवले यांनी राष्ट्रवादीच्या सारिका कोंढाळकर यांचा 2259 मतांनी पराभव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.