Sushma Andhare : 'रक्तातला प्लाज्मा काढून विकल्याचा आरोप असणारेच..' ; सुषमा अंधारेंचा पल्लवी सापळेंवर निशाणा!

Sushma Andhare Vs Pallavi Saple : 'अशा भ्रष्ट लोकांकडून काय प्रामाणिकपणाच्या अपेक्षा करणार?' असा सवालही केला आहे.
Sushma Andhare Vs Pallavi Saple :
Sushma Andhare Vs Pallavi Saple :Sarkarnama

Sasoon Hospital Case News : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून समितीवर अध्यक्ष म्हणून पल्लवी सापळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीवर शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेत टीका केली आहे.

पुणे विद्यापीठातील विविध प्रश्नांसंदर्भात मंगळवारी सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूची भेट घेतली यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या,'आज कुलगुरूंसोबत चर्चा झाली यामध्ये पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले. विद्यापीठामध्ये लायटिंगच्या नावाखाली दोन कोटींचा टेंडर घेतले गेलं, त्याचे एक कोटी 65 लाख रुपये खर्च केले आहे.रस्त्याच्या कामासाठी हा खर्च केला असं दाखवलं मात्र ते काम त्या गुणवत्तेचं झालं नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare Vs Pallavi Saple :
Sasoon Hospital News: चौकशीला किती वेळ लागेल सांगू शकत नाही? चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात

अंधारे पुढे म्हणाल्या, 'विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कोणाला कळतच नाही. तेरा दिवस होऊन देखील गुन्हा दाखल नाही. आम्ही इथल्या पोलीस निरीक्षकांना जाब विचारला मात्र त्यांनी सांगितलं की, याबाबत आज आम्हाला माहिती मिळाली आहे. विद्यापीठाकडून याबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे गांजा प्रकरण लपवणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगळी चौकशी व्हावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभेत आम्ही आवाज उठवणार आहोत.'

ससूनमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली असून या समितीवर अध्यक्ष म्हणून पल्लवी सापळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत बोलताना अंधारे म्हणाल्या, 'या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टरांवर जुजबी कलम लावले आहेत. त्यामुळे ते लवकरच बाहेर येतील. रक्त नमुन्यातील फेरफरीच्या चौकशीसाठी जे डॉक्टर आणलेत त्यांच्यावरच रक्तातला प्लाजमा काढून विकल्याचा यामिनी जाधव(Yamini Jadhav) यांनी आरोप केला आहे. हा आरोप सभागृहाच्या पटलावर केला आहे.'

Sushma Andhare Vs Pallavi Saple :
Pune Porsche Accident : मोठी बातमी, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले ; त्रिसदस्यीय समितीमार्फत होणार चौकशी !

तसेच 'जर एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागाचे तीन सदस्य नेमले पाहिजे होते. तसं झाली नाही. त्यामुळे आमचा अजिबात या समितीवर विश्वास नाही. सरकारला विनंती आहे की, पल्लवी सापळेंची(Pallavi Saple) नेमणूक रद्द झाली पाहिजे. जो डॉक्टर आधीच वादग्रस्त आहे. अशा भ्रष्ट लोकांकडून काय प्रामाणिकपणाच्या अपेक्षा करणार?' असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com