Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा; पतीला संपवण्यासाठी पत्नीकडून जादूटोण्याचा प्रयोग

Mohini Wagh Murder Conspiracy : भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वाघ यांचा काटा काढण्यासाठी पत्नीने जादूटोण्याचा प्रयोग केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 13 Feb : भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वाघ यांचा काटा काढण्यासाठी पत्नीने जादूटोण्याचा प्रयोग केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

पुणे (Pune) जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणात पहिल्यापासून धक्कादायक खुलासे होत आहेच. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर गुन्हे शाखेने मोहिनी वाघ यांना अटक केली आहे. तर ही हत्या प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचंही समोर आलं होतं.

Satish Wagh Murder Case
Shivendra Raje Bhosale : "महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले, तर.."; ठाकरेंच्या आमदाराच्या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेलं 'ते' उत्तर चर्चेत

अशातच आता चौकशी दरम्यान या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकरच असून त्याला मोहिनी वाघ यांनीच या कटात सामील केल्याचं खुलासा आरोपपत्रातून झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सतीश वाघ (Satish Wagh) यांची हत्या करण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

या हत्येप्रकरणी पुण्यातील लष्कर न्यायालयात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एक हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये प्रमुख आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यासह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मागील वर्षी 9 डिसेंबर रोजी सकाळी सतीश वाघ यांचे अपहरण झाले होते. अवघ्या पंधरा मिनिटांतच आरोपींनी 72 वार करून त्यांची क्रूर हत्या केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आला होता. या घटनेनंतर वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Satish Wagh Murder Case
Santosh Deshmukh murder Case : राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची अधिवेशनाकडे पाठ; संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात चर्चा होणार का ?

पोलिसांनी (Police) तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर या हत्या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले. अशातच आता हत्येप्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात मोहिनी वाघने सतीश वाघ यांना संपवण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सतीश वाघ हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com