Pune University News: अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे विद्यापीठाला मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती?

Savitribai Phule Pune University News Registrar Dr Manohar Sanap: विद्यापीठाने डॉ. सानप यांच्या नियुक्तीच्या आदेशात काही अटींची पुर्तता करण्यास सांगितले आहे. त्यानंतरच ही नियुक्ती ग्राह्य धरण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
Pune University registrar appointment news
Pune University registrar appointment newsSarkarnama
Published on
Updated on

Pune University administration: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी कुणाची निवड होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची नियुक्त रखडली होती. ही नियुक्ती छुप्या पद्धतीने केल्याचा आरोप विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नियुक्तीचे आदेश देताना मूळ संस्थेचे ‘ना - हरकत प्रमाणपत्र’ आणि संस्थेने कार्यमुक्त केल्याचे पत्र सादर करण्याची अट टाकली आहे. त्यामुळे डॉ. सानप हे पदभार नेमके कधी स्वीकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रशासन मौन

डॉ. सानप यांच्या नियुक्तीचा आदेश पुणे विद्यापीठ प्रशासनाने काढला असल्याची बाब अधिकृत असल्याचे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरून सांगितले आहे. डॉ.सानप यांच्या नियुक्तीचा आदेश अधिकृतरीत्या काढला असतानाही, याबाबत अधिकृतरीत्या माहिती देण्याबाबत विद्यापीठ प्रशासन मौन बाळगून आहे.

Pune University registrar appointment news
Income Tax New Rules: पगारदारांसाठी महत्वाची बातमी! 1 एप्रिलपासून 'फॉर्म 16' बंद, 'फॉर्म 130'ची एन्ट्री, टॅक्सचा हिशेब पूर्णपणे बदलणार

अटींची पुर्तता करा...

गेल्या अडीच वर्षांपासून विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची नियुक्त रखडली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला. याची दखल घेत अखेर विद्यापीठाने कुलसचिवांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठाने डॉ. सानप यांच्या नियुक्तीच्या आदेशात काही अटींची पुर्तता करण्यास सांगितले आहे. त्यानंतरच ही नियुक्ती ग्राह्य धरण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

Pune University registrar appointment news
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी प्रशासकीय कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

एका महिन्याचा कालावधी

अर्थात, ही प्रक्रिया नियमित नियुक्तीची प्रक्रिया असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. या नियुक्ती आदेशाच्या पत्रानुसार आवश्यक त्या अटींची पुर्तता करण्यासाठी डॉ. सानप यांच्याकडे नियुक्तीच्या आदेशापासून एका महिन्याचा कालावधी असणार आहे.

नियुक्ती छुप्या पद्धतीने?

तत्कालीन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२३ मध्ये संपला. तेव्हापासून या पदावर पूर्णवेळ कुलसचिव म्हणून अधिकारी न नेमता ही जबाबदारी प्रभारी कुलसचिवांकडे सोपविण्यात आली. त्यानुसार डॉ. विजय खरे, डॉ. ज्योती भाकरे आणि आता चारूशीला गायके यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. सानप यांची नियुक्ती छुप्या पद्धतीने केल्याचा आरोप विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

Pune University registrar appointment news
Lok Sabha Delimitation: केंद्रात हालचालींना वेग! लोकसभा-विधानसभेच्या जागा वाढणार; महाराष्ट्रात किती आमदार-खासदार?

‘‘विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती अडीच वर्ष गुलदस्त्यात ठेवून ऐन अधिसभेच्या आधी दोन दिवस नियुक्ती पत्र देण्याचा उद्देश नेमका काय, हे सर्वसामान्यांना समजले पाहिजे. पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याची जोरदार चर्चा आहे. विद्यापीठाच्या अधिसभेपूर्वी अशा पद्धतीने डॉ. मनोहर सानप यांना नियुक्ती आदेशाचे पत्र देऊन इतर सर्व विषयांना बगल देण्यासाठी आणि केवळ याच विषयावर चर्चा व्हावी, या उद्देशाने विद्यापीठाने हेतुपुरस्सर हा कट रचला आहे.’’

कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना

Pune University registrar appointment news
Ashok Kharat Case: चाकणकर अन् तटकरेंना झालेली जखम एकाच कारणामुळे..! काय योगा योग आहे, म्हणत अंधारेंनी डिवचलं

‘‘कुलसचिव पदाच्या नियुक्तीचे आदेशाचे पत्र काढताना लागू केलेल्या अटी शर्ती पूर्ण होऊ शकणार नाहीत, हे विद्यापीठ प्रशासनाला माहिती आहे. या नियुक्तीच्या होकारात नकार दडला आहे. ‘आम्ही कुलसचिवांची नियुक्ती केली’, असे विद्यापीठ म्हणून शकते. परंतु नियुक्ती आदेशातील अटी शर्ती पूर्ण होऊ शकत नाही, याची खात्री करूनच हे नियुक्ती पत्र दिले आहे,’’ असे विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com