Ambegaon Assembly : वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला; आंबेगाव दौऱ्यात नाव घेत दिले स्पष्ट संकेत!

Assembly Election 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे हे स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतील, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.
Dilip Walse Patil-Devdatta Nikam-Sharad Pawar
Dilip Walse Patil-Devdatta Nikam-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 20 July : जुन्नर-आंबेगावच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. २० जुलै) मंचर येथील पत्रकार परिषदेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. निकम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाचे कर्तृत्व वाया जाणार नाही, याची काळजी नेतृत्व घेईल, असे सांगून पवारांनी निकम यांची आंबेगावमधून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी निश्चित केल्याचे मानले जात आहे.

आंबेगाव (Ambegaon) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असेल? याबाबत शरद पवार (Sahard Pawar) यांनी देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीकडे लक्ष वेधले. निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालवला आहे. निकम यांचे कर्तृत्व आंबेगाव तालुक्यातील जनतेने आणि मी स्वतः अनुभवले आहे, त्यामुळे त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचे कर्तृत्व वाया जाणार नाही, याची दक्षता नेतृत्व म्हणून घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे हे स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतील, असेही शरद पवार यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आम्हाला मदत केली आहे. आमच्या सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला आहे, त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल, असेही त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांना विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून देण्यात येणार आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Dilip Walse Patil-Devdatta Nikam-Sharad Pawar
Sharad Pawar-Ajit Pawar : ‘साहेब-दादा एकत्र आले तर आनंदच; पण काही महत्वकांक्षी नेते तसे होऊ देणार नाहीत...’

वळसे पाटलांना टोला

आंबेगावातील डिंभे धरणातील पाणी बोगदा पाडून श्रीगोंदा, जामखेड आणि कर्जत भागाला पळविण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी पवार म्हणाले, गेली 30 ते 40 वर्षे मी आंबेगाव तालुक्यातील पाण्याची परिस्थिती अगदी जवळून पाहिली आहे, त्यामुळे कारण नसताना पाण्यावरून अंतर निर्माण करण्याचे काम शहाण्या माणसांनी करू नये, असा टोला त्यांनी नाव न घेता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लगावला.

Dilip Walse Patil-Devdatta Nikam-Sharad Pawar
Sharad Pawar On Dilip Walse : दिलीप वळसे पाटील संधीसाधू, आता उत्तर शोधण्याची वेळ; शरद पवारांचा कडक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com