Sharad Pawar And Friends : शरद पवारांची तोफ धडाडण्याआधीच पुण्यात 'मित्रां'ची फौज तैनात

Pune NCP News : पवार काढणार पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मानतील अढी
Pune NCP
Pune NCP Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राष्ट्रवादीतील बंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या साथीतील आठ मंत्र्यांची छाप आहे. सत्ता आणि अजितदादांच्या ताकदीचा पुरेपूर फायदा उठविण्याच्या हेतुने अनेकांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांची साथ सोडून, अजितदादांच्या तंबूत दाखल झाले. पण सत्तेसाठी फुटलेल्या नेत्यांचा हिशेब चुकविण्यासाठी पवार हे आपली ताकद दाखविण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा गुरुवारी समाचार घेऊन पवार हे येत्या रविवारी शक्यता आहे. ते पुण्यातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या मनातील अढी काढण्यासाठी दाखल होतील. मात्र, त्याआधीच पुण्यात शरद मित्रांची फौज उभी राहात आहे. त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरुड मतदारसंघात ‘आम्ही सारे शरद मित्र’चा आवाज बुलंद करण्यात आला. (Latest Political News)

Pune NCP
Sharad Pawar And Solapur : मंगळवेढ्यातील 'या' दोन युवा नेत्यांना शरद पवारांचं बळ; तालुक्यात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतर पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत दोन गट पडले. जुने शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे पवारांकडे राहिले; तर दुसरीकडे दीपक मानकरांनी अजितदादांचे नेतृत्व केले. दोन्ही बाजुंनी कार्यकर्ते-पदाधिकारी असले; तरीही राष्ट्रवादीतील संशयाचे राजकारणाने ही मंडळी बुचकळ्यात पडली आहे.

आधी आमदारांत, त्यापाठोपाठ नगरसेवकांत गोंधळ उडाला. त्यापुढे जाऊन सामान्य कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा आहे. त्यातच काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जगतापांनी पक्षा कार्यालयातून अजितदादांचा फोटो काढला. त्याला खुद्द अजितदादांनी उत्तर दिले. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आजघडीला कोणाचा झेंडा घेऊ हाती, अशी भावना आहे. त्यावर मोकळेपणाने बोलण्यासाठी शरद पवार पुण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मेळाव्याचीही तयारी झाली.

Pune NCP
Rohit Pawar Press : भाजप बिथरलाय म्हणूनच कुटुंब, पक्ष फोडण्याचे उद्योग ; रोहित पवार कडाडले..

राष्ट्रवादीतील संभ्रमाच्या वातावरणात पक्षाच्या कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्यासह काही नेत्यांच्या साक्षीने ‘मी शरद मित्र’ ही मोहीम हाती घेतली. त्यानिमित्त एकत्र आलेल्या राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे शरद मित्र’चा नारा दिला. बंडानंतरही पुण्यात पवारांवर निष्ठा कायम असल्याचे या मोहिमेतून दाखविण्याचा प्रयत्न आहे. पवारांच्या मेळाव्याआधी उघडलेल्या या मोहिमेची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

फुटीरांना अद्दल घडविण्याचा इरादा करून पवार राज्यभर फिरत आहेत. पहिल्या टप्प्यांत जुने साथीदार छगज भुजबळच्या मतदारसंघात जाऊन इशारे दिल्यानंतर पवारसाहेब गुरूवारी बीडमध्ये जाऊन कृषिमंत्री धनंजय मुंडेंविरोधात बंडखोरीविरोधात आवाज उठवणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.