Sharad Pawar : पवारसाहेबांनी मुस्लिम समाजाला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिलंय 'हे' आश्वासन !

Assembly Elections 2024 : मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाचे गावागावमध्ये व वॉर्ड स्तरावर संघटन वाढवण्याचे शरद पवार यांनी निर्देश दिले असल्याचे अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्राम खान यांनी सांगितले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्राम खान यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्राम खान यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली यामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. येत्या विधानसभेत अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली असता शरद पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे खान यांनी सांगितले.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात मुस्लीम (Muslim) व अल्पसंख्याक समाजाची मतदार यादीतून नवे गायब झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर अशा ठिकाणी नव्याने मतदार नोंदणी अभियान पक्षाच्या वतीने राबवण्याची सूचना शरद पवार यांनी केली. त्याचबरोबर गावगावात अल्पसंख्यांक समाजाचे संघटन करण्याचे सुचवले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे ) यांना सोबत घेऊन स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबविले जावेत, असे देखील सुचविण्यात आले आहे.

Sharad Pawar
Pune Political News : पुण्याचे राजकीय वजन वाढलं ! 25 आमदार 7 खासदार, जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संसदीय पदे

सामाजिक एकता आणि जातीय सलोखा वाढविण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात एकता आणि विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांमध्ये खान यांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबतची भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिली जात आहे.

Sharad Pawar
Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी;कोणाचे आमदार फुटणार?

सामाजिक कल्याण कार्यक्रम आणि अल्पसंख्यांक समुदाय विकास वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. खान यांच्या समाजकारणातील समर्पणामुळे त्यांना व्यापक मान्यता मिळाली आहे आणि पवारांसोबतची त्यांची भेट त्यांच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते. तसेच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्याचे इक्राम खान यांनी सांगितले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com