Sharad Pawar : शरद पवारांनी आघाडीचं टेन्शन वाढवलं; '...म्हणून लोकसभेला दोन पावलं मागं सरलो'

NCP Sharad Pawar Vidhansabha Election : लोकसभेत यश मिळाले आता राज्य हातात घ्यायचे आहे. त्यासाठी उद्यापासूनच विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेशही पवारांनी दिले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे 10 जागांपैकी 8 खासदार निवडून आले. यावेळी आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीत बिघाडी नको म्हणून कमी जागांवर समाधान मानले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

आता या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळवण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार बार्गेनिंग केले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार Sharad Pawar बोलत होते. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीत ऐक्य राहण्यासाठी दोन पावले मागे सरलो. एकत्रित लढलो म्हणूनच निवडणुकीत यश मिळाले, असेही पवारांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेवर भाष्य केले असले तरी शरद पवारांच्या टार्गेटवर विधानसभा निवडणूक असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेच्या कामाला लागा

या बैठकीत पवारांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवहान केले. ते म्हणाले, राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात सर्वात जास्त प्रश्न असतात. लोकसभेत चांगले यश मिळाले आहे. आता आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. त्यादृष्टीने उद्यापासूनच विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असेही पवारांनी आदेश दिले आहेत.

Sharad Pawar
Udayanraje Bhosale Rajya Sabha Seat: 'राज्यसभेतील उदयनराजेंच्या रिक्त जागेवर साताऱ्यातीलच पदाधिकाऱ्याला संधी द्या' ; सातारा भाजपाची मागणी!

जागा वाटपात काय होणार?

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने स्वबळाची भाषा केली. लोकसभेत शरद पवार गटाने फक्त 10 जागा लढवून 8 जिंकल्या. तर ठाकरे गटाने 21 पैकी 9 आणि काँग्रेसने 17 पैकी 13 जागांवर यश मिळवले आहे. यात शरद पवार गटाचा सर्वात जास्त 80 टक्के स्ट्राईक रेट राहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट जास्त जागांचा आग्रह करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जागा वाटपावेळी ठाकरे आणि काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sharad Pawar
Video Aaditya Thackeray On CET Exam : 'पैसे कमविणे हाच सीईटी परीक्षेचा उद्देश होता का?' आदित्य ठाकरेंचा प्रश्न !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com