Loksabha Election : मतदानानंतर दिलीप वळसे -पाटलांनी बोलून दाखवली खंत, म्हणाले...

Dilip Walse Patil : वळसे पाटील म्हणाले, काही कारणाने छोटीशी दुखापत झाली. मी गेली दीड महिने हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमधून प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेऊन योग्य त्या सूचना देत होतो.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

सुदाम बिडकर

Loksabha Election : शिरुर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव-पाटील आणि महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे Amol kolhe यांच्यामध्ये चुरस आहे. आज (सोमवारी) मतदानाच्या दिवशी दोन्ही पक्षांनी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचे प्रयत्न करत आहेत. रुग्णालयात दाखल असल्याने मंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रचारात दिसले नाहीत. मात्र, आज आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, त्यांच्या पत्नी किरण वळसे-पाटील, मुलगी पूर्वा वळसे-पाटील यांच्यासह येऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर वळसे पाटील यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

Dilip Walse Patil
Shivsena-AIMIM News : हात तोडण्याची भाषा अन् हातमिळवणी, इम्तियाज-दानवे समोरासमोर

'खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. दुर्देवाने आज मोठ्या नेत्यांपासून लहान नेत्यांपर्यंत राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेऊन वैयक्तिक आरोप करणे भावनिक आवाहन करणे वगैरे हे लोकशाहीला शोभा देण्यासारखे नाही, असे मला वाटते.' अशी खंत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील Dilip Walse Patil यांनी व्यक्त केली.

वळसे पाटील म्हणाले, काही कारणाने छोटीशी दुखापत झाली. त्यामुळे व्हीलचेअरच्या साह्याने येऊन मतदान Voting केले मतदान केले. मी गेली दीड महिने हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमधून प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेऊन योग्य त्या सूचना देत होतो. वेळोवेळी आढावा घेत होतो. गेली अनेक पंचवार्षिक पासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो.परंतु दुर्देवाने यावेळी मला ती घेता आली नाही.

आढळराव पाटील विजयी होतील

तरीही आमचा राष्ट्रवादी पक्ष सर्व सामान्यांपर्यंत पोहचलेला कार्यकर्त्याचे मोठी फळी असलेला पक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झटून काम केले आहे. त्यामुळे आमचे उमेदवार आढळराव-पाटील निश्चित विजयी होतील, असा विश्वासही वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

Dilip Walse Patil
Shivsena-AIMIM News : हात तोडण्याची भाषा अन् हातमिळवणी, इम्तियाज-दानवे समोरासमोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com