Shirur Lok Sabha Election : आढळराव अन्‌ वळसे पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास; तब्बल सव्वातास रंगली खलबतं...

Walse Patil-Adhalrao News : शिरूरमधून लोकसभेची निवडणूक आढळराव यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर लढविण्याच्या दिशेने पडलेले एक पाऊल मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या स्लोगन प्रमाणे आढळराव-वळसे पाटील यांनी ‘जुन्या मैत्रीचा नवा पूल’ बांधण्याचे ठरविल्याची चर्चा रंगली आहे.
Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse PatilSarkarnama

Ambegaon News : शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांमध्ये शनिवारी (ता. २ मार्च) तब्बल सव्वा तास खलबतं झाली. मंत्री वळसे पाटील यांच्या गाडीत झालेल्या या चर्चेचा थांगपत्ता या कानाचा त्या कानाला लागलेला नाही. मात्र, शिरूरमधून लोकसभेची निवडणूक आढळराव यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर लढविण्याच्या दिशेने पडलेले एक पाऊल मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या स्लोगन प्रमाणे आढळराव-वळसे पाटील यांनी ‘जुन्या मैत्रीचा नवा पूल’ बांधण्याचे ठरविल्याची चर्चा रंगली आहे. एकत्र प्रवासाच्या वृत्ताला आढळराव पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या, सोमवारी (ता. 4 मार्च) आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. हेलिपॅडवर अजित पवार यांचे स्वागत सहकार मंत्री वळसे पाटील, देवेंद्र शहा यांच्या समवेत शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटीलही (Shivajirao Adhalrao Patil) करणार आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांची पाऊले राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दिशेने वेगाने पडताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा कोणाला मिळणार? जयंत पाटलांनी उघडले गुपित

शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळाच्या विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित होते.

वढू बुद्रूक येथील कार्यक्रम संपल्यानंतर सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या गाडीत आढळराव येऊन बसले. गाडीत अन्य कुणीही नव्हते. शिरूर तालुक्यातील वढु बुद्रूकपासून आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाट्यापर्यंत पोचायला सुमारे सव्वातासाचा अवधी लागतो. वढू बुद्रूकपासून अवसरी फाट्यापर्यंत या दोघांनी एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असणार. कारण आढळराव यांचा राष्ट्रवादी प्रवेश चर्चेत आहे.

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Solapur News : माढ्यात भाजप खासदाराच्या गाडीपुढं शेतकऱ्यांनी फेकली गाजरं; निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या

दरम्यान, गाड्यांचा ताफा अवसरी फाटा येथे आल्यानंतर आढळराव पाटील हे वळसे पाटील यांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांच्या गाडीत बसले. गायमुख बायपासमार्गे ते लांडेवाडी आपल्या निवासस्थानाकडे निघून गेले. मंत्री वळसे पाटील हे थेट मंचरला आले. मात्र, अवसरी फाट्यावर आढळराव यांना वळसे पाटील यांच्या गाडीतून उतरताना अनेकांनी पाहिले. या दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भात नक्की चर्चा झाली असणार. मात्र, त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.

मैत्री अन्‌ संघर्ष

आढळराव, वळसे पाटील आणि देवेंद्र शहा हे एकेकाळचे जिवलग मित्र होते. वळसे पाटील 2000 मध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांचा जनता दरबार लांडेवाडी येथील आढळरावांच्या बंगल्यावरच भरायचा. वळसे पाटलांच्या अनुपस्थितीत आढळराव हेच अनेक विकासकामांची उद्‌घाटने करायचे. मात्र, 2004 मध्ये लोकसभेसाठी आढळराव यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतून ते खासदार झाले आणि सलग तीन निवडणुका जिंकल्या. या काळात वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात टोकाचा संघर्ष झाल्याचे अख्खा पुणे जिल्ह्याने पाहिला. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे दोन मित्र पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत.

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Maharashtra Congress : अशोक चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसला फरक पडत नाही; थोरातांचे सूचक वक्तव्य

‘दादा, आता नवीन घड्याळ हातात बांधा’

अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गेल्या महिन्यात मंचरच्या मुख्य बाजारपेठेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आढळराव पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी देवेंद्र शहा यांनी ‘दादा, हातातील घड्याळ आता जुने झाले आहे, नवीन घड्याळ बांधा’ असे सूचक वक्तव्य केले होते. या वक्तव्याला आढळराव पाटील यांनी स्मितहास्य करून दाद दिली होती.

Edited By : Vijay Dudhale

Shivajirao Adhalrao Patil-Dilip Walse Patil
Maval Lok Sabha : शेळकेंनी पुन्हा वाढवलं बारणेंचं टेन्शन; म्हणाले, 'राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाखांच्या...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com