Shirur Loksabha Election : अजितदादांचा हा आमदार आढळरावांचा गेम करणार, अमोल कोल्हेंना छुपी मदत करणार ?

Loksabha Election 2024 : एकीकडे शिरूर लोकसभा निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही पवारांना झुलवत ठेवलेल्या या आमदाराने महायुतीमध्ये राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचा शब्द मोठ्या पवारांना दिला असल्याचे बोलले जात आहे.
Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patilsarkarnama
Published on
Updated on

Shirur Loksabha News : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असताना राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, महायुती- महाविकास आघाडीमध्ये कुरघोडी आणि कुरबुरीचे राजकारण सुरू आहे. आता याचदरम्यान एक मोठी खळबळजनक माहिती समोर येत आहे. अजित पवार समर्थक आमदाराने आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना मदत करण्याचा शब्द शरद पवार यांना दिल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

एकीकडे शिरूर लोकसभा निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली असतानाच दोन्ही पवारांना झुलवत ठेवलेल्या हडपसरच्या आमदाराने महायुतीमध्ये राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचा शब्द मोठ्या पवारांना दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या आमदाराच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (NCP Political News )

Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Jitendra Awhad Vs Ajit Pawar : 'अजित पवारांच्या वाट्याला पंचपक्वान्न होती, मात्र...' ; जितेंद्र आव्हाडांनी लगावला टोला!

माजी आमदार महादेव बाबर यांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा कोंढवा येथे पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पवारसाहेबांच्या कानात शिरूरमध्ये मी कोल्हे यांना मदत करतो असा शब्द दिला, यावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांना आतून मदत करतो, असे पवारसाहेबांना शब्द देणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या या नेत्याने हडपसरमधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना डॉ. कोल्हे यांचे काम करायचे नाही, असा दम देत आहे. राष्ट्रवादी काँगेसच्या दोन्ही गटांना झुलवण्याचे काम केले अशांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हडपसरमधील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर शिवसेना शहरप्रमुख समीर तुपे यांनी पळून गेलेल्या आमदाराला परत घेऊ नका असे जाहीर आवाहन केले. यावर निष्ठावंतांना न्याय मिळेल, असे जगताप यांनी सांगितल्याने हडपसरच्या अजित पवार गटाच्या आमदाराची चांगलीच कोंडी झाली आहे.

महायुतीमध्ये शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांचा प्रचार हडपसरचे आमदार करत आहेत अन् शरद पवारांना आतून मदत करतो, असे सांगून अजित पवारांबरोबर आढळराव पाटील यांचीदेखील कोंडी झाली आहे.

Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Rohit Pawar News : '... म्हणून अजितदादा तुम्ही भाजपसोबत गेले आहात का ?'; रोहित पवारांचा खोचक सवाल

हडपसरमधील अजित पवार गटातील चार नगरसेवक पुन्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आहेत, आणखी नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात असल्याने हडपसरच्या आमदाराला राजकीय भीती वाटू लागल्याने लोकसभेनंतर पुन्हा आपण शरद पवारांबरोबर (Sharad Pawar) जाणार असे सांगून संभ्रम निर्माण करत आहेत, आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे विकास लवांडे यांनी जाहीर केल्याने भाजपने अजित पवार मित्र मंडळाची कुचंबणा केल्याचे सांगितले.

R

Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Eknath khadse News : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार; चंद्रकांत पाटलांची न्यायालयात याचिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com