Anna Bansode : अजितदादांच्या कट्टर समर्थकाचं राष्ट्रवादीतील वजन वाढलं; विधानसभा उपाध्यक्षपदाबरोबरच दोन महत्वाचं पदंही सोपवली!

NCP Leadership Changes: अजित पवारांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अण्णा बनसोडे हे २००९, २०१९ आणि २०२४ असे तीन वेळा निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती.
Anna Bansode | Ajit Pawar
Anna Bansode | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 28 March : मात्र,सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पानटपरी चालवत आपला जीवनचरितार्थ चालविणारे अण्णा बनसोडे हे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार बनले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती.

मात्र, जादा इच्छूक आणि मंत्रिपदे कमी यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळू शकले नाही. मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी देऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय विविध समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अण्णांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजन वाढल्याचे दिसून येत आहे.

अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची राजकीय कारकिर्द १९९७ पासून पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक म्हणून सुरुवात झाली. ते २००२ पर्यंत नगरसेवक होते. पिंपरी चिंचवड महापलिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. पुढे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले.

मोदी लाटेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र, पुढच्या २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आपली ताकद दाखवत तिसऱ्यांदा निवडून आले.

पिंपरी चिंचवडचे नगरसेवक ते विधानसभेचे उपाध्यक्ष या अण्णा बनसोडे यांच्या वाटचालीत अजित पवार (Ajit Pawar) यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच बनसोडे हे उपाध्यक्षपदापर्यंत पोचले आहेत.

Anna Bansode | Ajit Pawar
MPs and MLAs salary : आमदार-खासदारांची कमाई वाढली, जनता बेहाल! हा रिपोर्ट तुमची स्थिती सांगतोय...

नगरसेवक ते विधानसभेचे उपाध्यक्षपद या वाटचालीत अजितदादांच्या मिळालेल्या खंबीर पाठिंब्याची जाणीव ठेवून अण्णा बनसोडे यांनीही कायम अजित पवारांची पाठराखण केली आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने तिकिट कापूनही उपमुख्यमंत्री अजितदादांनी मध्यरात्री एबी फार्म दिला होता. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या प्रत्येक बंडाच्या वेळी अण्णा बनसोडे यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे.

अजित पवारांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अण्णा बनसोडे हे २००९, २०१९ आणि २०२४ असे तीन वेळा निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नऊ मंत्रिपदे आले आहेत, त्यामुळे मोजक्या मंत्रिपदामुळे बनसोडे यांना अजितदादांना मंंत्रिपदी संधी देता आली नाही. मात्र, विधानसभेचे उपाध्यक्ष देऊन अजित पवारांनी त्याची भरपाई केली आहे.

Anna Bansode | Ajit Pawar
Ramraje Wins Legal Battle: रामराजेंनी अखेर करून दाखवलंच! रणजितसिंहांना धोबीपछाड देत कोर्टातून हटवला 'श्रीराम'वरील प्रशासक

विधानसभेच्या उपाध्यक्षपदाबरोबरच विधीमंडळाच्या दोन समित्यांचे अध्यक्षपदही अण्णा बनसोडे यांच्याकडे देण्यात आले आहे. यामध्ये विनंती अर्ज समिती आणि सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत समिती या दोन्ही समितीचे प्रमुखपद अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अण्णा बनसोडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वजन वाढल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com