सोमय्यांना मारण्याचा डाव होता? : शिवसेनेच्या मोरेंविरोधात तक्रार दाखल

शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आज पुण्यात राडा झाला. सोमय्या जम्बो कोविड सेंटरमधील भ्रट्राचाराची चौकशी व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी आले होते. ते महापालिकेत जात असताना शिवसेनेच्या (ShivSena) कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी झालेल्या झटापटीत ते खाली पडले. या झटापटीत सोमय्या गंभीर जखमी झाले. त्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे.

सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, आज (ता ६) शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी प्रशांत लाटे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या ६० ते ७० पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की ''किरीट सोमय्या हे महानगरपालिकेमध्ये जात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी व शिवीगाळ केली. पाऱ्यांवर झालेल्या झटापटीत सोमय्या खाली पडले.

Kirit Somaiya
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोमय्या व्हीलचेअरवर बसून थेट महापालिकेत

त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले व गाडीमध्ये बसवले. त्यांची गाडी महापालिकेच्या आवातारतून निघत असताना संजय मोरे त्यांच्या गाडीसमोर झोपले. पोलिसांनी मोरे यांना बाजूला करुन सोमय्या यांची गाडी गेटच्या बाहेर आणली त्यावेळी शिवसेनेचे ६० ते ७० कार्यकर्ते हातात दगड विटा घेउन उभे होते, हा सोमय्या यांना मारण्याचा डाव होता, असे तक्रारीत म्हटले आहे. सोमय्या पाऱ्यावर पडल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे.

Kirit Somaiya
...अन्यथा सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती : चंद्रकांत पाटील

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टिकाकरत सध्या गुंडाराज आहे, असे म्हटले होते. आज किरीट सोमय्यांना मारण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यांना ठार मारण्याचा हेतू होता, असा आरोपही पाटील यांनी केला होता. सोमय्यांवर हल्ला करून काही होणार नाही. काय करत होते पोलिस? आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, असेही पाटील म्हणाले होते. भाजप आमदार नितेश राणेंच्या बाबतीत सुडबुडदबीने वागणे चालले आहे. आम्ही कायदा पाळतो, सरकार अजूनही कायदा पाळत नाही. आम्ही घाबरत नाही. आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार चालणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com