Shiv Sena News : शिवसेना नेत्याचा राजकारण सोडण्याचा निर्णय; ‘बदलती राजकीय संस्कृती, तत्त्वांचा घसरता स्तर...’

Ramesh Yewale News : शिवसेना नेते रमेश येवले यांनी सोशल मीडियावरून राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या घोषणेमुळे आंबेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली असून निर्णयामागील कारणांबाबत उत्सुकता आहे.
Ramesh Yewale
Ramesh YewaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 02 November : आंबेगाव तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय असलेले, दांडगा जनसंपर्क आणि दानशूर व्यक्तिमत्त्व अशी ओळख निर्माण केलेले शिवसेना नेते रमेश येवले यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंबेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी हा निर्णय एवढ्या तातडीने का घेतला, यामागचं कारण काय, अशी उलटसुलट चर्चा रंगली आहे.

रमेश येवले यांनी आंबेगाव तालुक्यातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. सुरवातीच्या काळात विविध मंदिरांच्या कामांसाठी मदत, अखंड हरिनाम सप्ताहांना सहकार्य आणि आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत, गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याचे काम त्यांनी केले. त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

आंबेगाव मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारसाठी ते इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांनी माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून लांडेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते. श्रावण महिन्यात त्या कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी खुद्द शिवसेनेचे मुख्य नेते तथा खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.

Ramesh Yewale
Satara Dcc Bank Chairman : सातारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंचे मोठे विधान : ‘अध्यक्षपद किती वर्षांसाठी द्यायचं हे...’

राजकीय निवृत्तीच्या निर्णयाबाबत येवले म्हणाले, राजकारणातील बदलती संस्कृती, तत्त्वांचा घसरत चाललेला स्तर आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे राजकारणापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात टिकण्यासाठी तत्त्वांशी तडजोड करणे माझ्या स्वभावात नाही. आजच्या असंवेदनशील राजकारणात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, ही खंत आहे.

राजकीय वाटचालीला पूर्णविराम दिला असला तरी समाजसेवेचा प्रवास थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'मोरया सामाजिक ट्रस्ट'च्या माध्यमातून अडचणीतील कुटुंबांना आधार देणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि सर्वसामान्य कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पडावेत, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा संकल्प येवले यांनी बोलून दाखवला.

Ramesh Yewale
Maharashtra Politics : 'राष्ट्रवादी लाचारांचा पक्ष, भीक मागितल्या गत अर्थखाते...', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

राजकारण सोडत आहे. मात्र, माणुसकीचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम यापुढेही सुरूच राहील, असेही येवले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.