फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधड्या भिजवत होते तेव्हापासून बाळासाहेब शिवतीर्थावरून विचारांचं सोनं उधळत होते..

Dasara melava 2022 : राजकारणात कुणी संपत नसतो. शिवसेनेचंही तसंच आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढत मुंबई हायकोर्टानं शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (dasara melava 2022)घेण्यास परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चांगलंच बळ आलं आहे.

ठाकरे गटाने न्यायालयीन लढाई लढून शिंदे गटाला धडा शिकवला आहे. एकनाथ शिंदेंना (eknath shinde) मिंधे मुख्यमंत्री म्हणत शिवसेनेनं त्यांना डिवचलं आहे.(dasara melava 2022 latest news)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची खाज सुटली", असं म्हणत शिवसेनेनं शिंदे गटावर दसऱ्या आधीच हल्ला चढवला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शिवसेनेनं सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray
Rajasthan : गेहलोत सरकार कोसळणार ; 82 आमदारांचे राजीनामे, मुख्यमंत्री होण्याचे पायलटांचे स्वप्न भंगणार ?

"दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे. फडणवीसांचे ‘मिंधे’गोधड्या भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचं सोनं विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेनं महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्यानं", असं म्हणत शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आलंय.

शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये..

"चार दिवसांपूर्वीच (उप) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, 'मला संपविण्याचे खूप प्रयत्न शत्रूंनी केले, पण मी संपलो नाही.' राजकारणात कुणी संपत नसतो. शिवसेनेचंही तसंच आहे. गेल्या 56 वर्षांत शिवसेनेला संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमानं आणि तेजानं उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये", असे खडेबोल शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत भाजपला सुनावले आहेत.

डुप्लिकेट 'सेना' चालवीत आहेत..

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक 'डुप्लिकेट' पुण्यात आढळला. त्या डुप्लिकेटबरोबर काही हवशा-नवशा-गवशांनी सेल्फी काढल्या म्हणून त्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास दम भरला. ते 'मिंधे' असले तरी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान करू नका. आता हाच न्याय 'मिंधे' गटाच्या डुप्लिकेट सेनेस लागायला नको काय? स्वतःचा डुप्लिकेट चालत नाही, पण जे स्वतःच डुप्लिकेट 'सेना' चालवीत आहेत. त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची खाज सुटली",

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com