
Pune politics 2025 : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले पाच माजी नगरसेवक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरेंची सेना सोडल्यानंतर या माजी नगरसेवकांना शिंदेंच्या सेनेमध्ये घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र तो पर्याय जुगारून या माजी नगरसेवकांनी भाजपची वाट का? धरली या मागची काही कारणं आता समोर आली आहेत.
माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट असे एकूण ठाकरे यांच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक कार्यकर्त्यासह दुपारी 1.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश करणार आहे.
या पाच माजी नगरसेवकांकडून याबाबतची घोषणा एक जानेवारीलाच करण्यात आली होती. या माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कारभारावर टीका करत आपण ठाकरे सेना सोडून भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेकडून लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेत या जागांवरती आपला दावा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे या जागा भाजपच्या वाट्याला जाणार नसून महायुतीमध्ये ह्या जागा आपल्याकडेच राहणार असल्याचे सांगत या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. मात्र या सर्वांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय ठाम केला आहे.
ठाकरेंची सेना सोडल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय खुला असताना देखील या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का? घेतला याबाबत सर्वत्र चर्चा आहेत. त्या संदर्भात काही गोष्टी समोर आल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांना नावे ठेवण्याचा व त्यांच्यावर टीका करण्याचा आहे. त्यामुळे इतक्या वर्ष ज्या पक्षांमध्ये राहिलो त्यावर टीका टाळण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक भाजपची निवड केली असल्याचं या प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांकडून सांगण्यात आला आहे.
त्या सोबतच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शहरांमध्ये भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. तसेच भाजपचे स्थानिक नेते पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावरती लढण्यास इच्छुक आहेत. त्याबाबतच्या वाचता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये युती होण्याची शक्यता थोडी कमीच दिसत आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक होणे हे अधिक फायदेशीर असल्याचं बोललं जात आहे.
त्यासोबतच शहरात भाजपाचा खासदार आणि केंद्रीय मंत्री आहे. दोन मंत्र्यांसह भाजपचे सहा आमदार देखील आहेत. त्यामुळे आगामी काळात निधी मिळणे आणि कामे मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून भाजप हा उत्तम पर्याय वाटल्याने या सर्व नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय जुगारून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.