Khed Panchayat Samiti Result : ठाकरेंच्या पठ्ठ्याने गड राखला, पुणे जिल्ह्यात एकमेव पंचायत समितीवर सत्ता!

Shiv Sena UBT Babaji Kale : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, खेडमधून बाबाजी काळेंनी सत्ता खेचून आणली आहे.
Shiv Sena, Uddhav Thackeray
Shiv Sena, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता येण्याचे चित्र आहे.

महायुतीचे तिन्ही पक्ष जोरदार मुसंडी मारत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांची मात्र मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाल्याची पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील अपेक्षित यश मिळाले नसताना पुणे जिल्ह्यात पक्षासाठी गुड न्यूज आली आहे.

खेड पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. खेड पंचायत समितीच्या 16 जागांपैकी ठाकरे सेनेने 12 जागांवर विजय मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील ठाकरेंचे एकमेव आमदार असलेल्या बाबाजी काळे यांनी आपला गड राखला असल्याचं बोलले जात आहे.

एकीकडे पंचायत समितीचे सत्ता येत असताना दुसरीकडे मात्र बाबाजी काळे यांच्या बहिणीचा मात्र पराभव झालेला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती खेडमध्ये झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.आमदार बाबाजी काळे यांच्या बहिणीचा शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नीने ४०० मतांनी पराभव केला आहे.

Shiv Sena, Uddhav Thackeray
Sanika Awade: भाजप आमदार राहुल आवाडेंची कन्या सानिका आवाडे विजयी! चौथ्या पिढीचं दणक्यात स्वागत, उच्चांकी मतांनी विजय

खेड तालुका

जिल्हा परिषद गट :-

वाडा - वाशेरे गट :

आरक्षण - अनुसूचित जमाती

राष्ट्रवादी काँग्रेस - समीर सुपे विजयी

--------------

कडूस - चास गट :

आरक्षण - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

शिवसेना ठाकरे - तनुजा घनवट विजयी

---------------

रेटवडी-वाफगाव गट :

आरक्षण - सर्वसाधारण-स्त्री

शिवसेना ठाकरे - दीप्ती भोगाडे विजयी

-----------------

पिंपळगाव तर्फे खेड - मरकळ :

आरक्षण - सर्वसाधारण

शिवसेना ठाकरे - विजयसिंह शिंदे विजयी

-------------------

मेदनकरवाडी - काळूस :

आरक्षण - नागरिकांचा मागास प्रवर्ग

शिवसेना ठाकरे - गणेश अरगडे विजयी

-----------------------

पाईट - आंबेठाण :

आरक्षण - सर्वसाधारण-स्त्री

राष्ट्रवादी काँग्रेस - सुनीता बुट्टे पाटील विजयी

---------------------

नाणेकरवाडी -महाळुंगे :

आरक्षण - सर्वसाधारण

राष्ट्रवादी काँग्रेस - गणेश बोत्रे विजयी

---------------------

कुरुळी - आळंदी ग्रामीण :

आरक्षण - सर्वसाधारण-स्त्री

शिवसेना ठाकरे - विनया मुंगसे विजयी

Shiv Sena, Uddhav Thackeray
ZP Election Results: भाजपची 25 वर्षांची सत्ता उलथवली! अजितदादांचा पठ्ठ्या ठरला विजयाचा 'शिल्पकार'...सगळ्याच जागा जिंकल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com