Shivsena UBT News : 'साहेब किती गळाले किती राहिले ते पाहा', पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेची जुळवा जुळव

Uddhav Thackeray politics : गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या पैकी किती नेते अद्याप आपल्याकडे आहेत याचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर रणनीती आखण्यात येत आहे. याबाबतचा एक प्रस्ताव पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना दिला आहे. या प्रस्तावात गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या पैकी किती नेते अद्याप आपल्याकडे आहेत याचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडणारी संख्या मोठी आहे. पुण्यात देखील ठाकरेंच्या सेनेला गळती लागली असून पाच माजी नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपची (BJP) वाट धरली आहे. तसेच अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

Shivsena UBT News
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेला 10 वर्षे पूर्ण; जाणून घ्या कसे उघडायचे खाते, काय होईल फायदा?

या पार्श्वभूमी वर 2017 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेले आणि सात ते दहा हजार मतदान घेतलेले नेते सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेत आहेत की त्यांनी देखील वेगळी वाट निवडली आहे. याबाबतची चाचपणी ठाकरेंच्या शिवसेनेतून करण्यात येणार आहे. नुकतेच पुण्यातील ठाकरे सेनेच्या नेत्यांनी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषद आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांची भेट घेऊन पुणे महापालिकेच्या संदर्भात संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.

यावेळी पुणे संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर शहराध्यक्ष संजय मोरे आणि शहराध्यक्ष गजानन थरकुडे , माजी नगरसेवक वसंत मोरे ,संजय भोसले, पृथ्वीराज सुतार तसेच कामगार नेते रघुनाथ कुचिक उपस्थित होते. या भेटी दरम्यान मागील निवडणुकीत 2017 मध्ये शिवसेनेने स्वबळावर पुण्यामध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आठ लाख 23 हजार इतकी मतं मिळाली होती. जवळपास 14 टक्के मतदान हे शिवसेनेला (Shivsena) झालं होतं.

Shivsena UBT News
Walmik Karad : वाल्मिक कराडला दिलासा; न्यायालयाकडून 'ती' मागणी मान्य

त्यामुळे त्या वेळेचा विचार केल्यास शिवसेना 138 जागांवरती स्वबळावरती निवडणूक लढण्यास सक्षम असल्याचं स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना सांगितलं आहे. तसेच महाविकास आघाडी म्हणून लढायचं झाल्यास 60 ते 65 जागा आपल्याला घ्याव्यात अशी देखील मागणी या नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. पुढील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे पुण्यात येणार असून या सर्व बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com