
Pune News, 19 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील नेते वंसत मोरे यांनी खासदार संजय यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर वसंत मोरेंनी या पुस्तकाची एक प्रत आणली असून ती त्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवली आहे.
त्यानंतर या पुस्तकातील काही पाने वाचल्यानंतर हे पुस्तक शिवसैनिक आणि आम्ही वाचणारच आहोत. पण हे पुस्तक वाचण्याची खरी गरज भाजपच्या लोकांना असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. शिवाय यावेळी त्यांनी राऊतांनी पुस्तकामध्ये वास्तव आणि खरं लिहिल्याचं म्हणत पुस्तकावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचल्यानंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, "नरकातला स्वर्ग पुस्तक मी घरच्या देव्हाऱ्यात ठेवून पुजलं. या पुस्तकातील मी आतापर्यंत 40 पाने वाचली. आम्ही शिवसैनिक म्हणून हे पुस्तक वाचणार आहोतच. पण हे पुस्तक वाचण्याची खरी गरज भाजपच्या लोकांना आहे.
आज मोदी विश्वगुरु होण्याची पायाभरणी शिवसेनेने केली आहे. मोदीसाहेब फडणवीससाहेबांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. त्यांना देखील या पुस्तकातून प्रेरणा मिळणार आहे. ज्यांना विरोधात बसून राजकारण करायचे आहे त्याच्यासाठी हे पुस्तक आहे. या पुस्तकात कटू अनुभव असून हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. प्रत्येक शिवसैनिकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.
दरम्यान, यावेळी त्यांनी या पुस्तकातील बाजीराव मोदी हा विषय मला या सगळ्यात जास्त भावल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, थोरले बाजीराव कुठे होते हे सर्वांना माहिती आहे. पुण्यातील भाजपवाल्यांनी (BJP) हे पुस्तक वाचले पाहिजे. अटकेपार झेंडे लावण्याचे काम बाजीराव यांनी केले आहे. मला सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर भगवा झेंडा फडकावायचा आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील निर्धार बोलून दाखवला.
तसंच राऊत यांच्यावर आरोप झाले चे पत्राचाळ प्रकरण आहे. यामध्ये म्हाडा आणि विकासक असतील तर राऊत आले कुठून? त्यांना क्लीन चीट दिली आहे. आर्थर जेलमध्ये वेडे करण्याचे काम होत होते अस त्या पुस्तकात लिहिलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना हटवू नका, असं बाळासाहेबांनी सांगितले होतं. भाजप मोदींना हटवणार होते पण बाळासाहेब ठाकरेंमुळे ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले, आम्ही शिवसैनिक म्हणून हे पुस्तक वाचणार आहोतच पण जे नरेंद्र मोदी यांना विश्वगुरु मानतात अशा भाजपवाल्याने हे पुस्तक वाचले पाहिजे, असा सल्ला मोरे यांनी पुणे भाजपला दिला.
दरम्यान, ज्यांनी ज्यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावर टीका केली आहे. त्यांना देखील मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात त्याला महत्त्व नाही. राऊतांनी सगळं खरे लिहिले आहे. शिवाय अजित पवार सध्या स्वर्गात आहेत. ते सत्तेत आहेत. ते नरकात होते आता स्वर्गात गेलेत, ते स्वर्गाची मजा घेत आहेत, असं म्हणत मोरेंनी अजितदादांवरही निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.