Pune Police News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दावा दाखल केली होता. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना 23 फेब्रुवारी अगोदर तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांकडून हा तपासणी अहवाल 5 मार्चपर्यंतही सादर न झाल्याने, अखेर न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे. सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात(Rahul Gandhi) पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केलेला आहे. या प्रकरणी सात्यकी सावरकरांकडून सर्व पुरावे आणि साक्षीदारही न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणात न्यायालयास प्राथमिक सत्यता आढळून आल्याने 19 फेब्रवारी रोजी न्यायालयाने पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते आणि 23 फेब्रुवारी अगोदर तपासणी अहवाल सादर करण्यास सांगतिले होते. मात्र, हा हवाल 5 मार्चपर्यंतही सादर न झाल्याने पोलिसांकडून कर्तव्यात कसूर झाल्याप्रकरणी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे.
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता. शिवाय सावरकर(Savrkar) आणि त्यांचे पाच-सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते, तेव्हा त्याना आनंद होत होता, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले होते. याविरोधात सात्यकी सावकर यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.