NCP Sharad Pawar: '...म्हणून मी संजय राऊतांचा फॅन!'; असं शरद पवार गटाचा माजी आमदार का म्हणाला?

Pimpri Chinchwad Politics : शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक नगरसेवक असतानाही महापौर म्हणून भाजपचा विरोधी पक्षनेता कसा केला,हे त्य़ांनी यावेळी प्रथमच जाहीरपणे सांगितले.
Sanjay Raut and Sharad Pawar
Sanjay Raut and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : संजय राऊत हे फुल नडेश असल्याने त्यांचा मी मोठा फॅन आहे. ते तुरुंगात जाऊन आले,तरी कुणालाही ते सकाळपासून नडतात,असे विधान कुण्या ठाकरे गटाच्या नेत्याचे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याचे आहेत. मावळचे पहिले खासदार शिवसेनेचे दिवंगत गजानन बाबर यांच्या संघर्षयात्री या चरित्रग्रंथाचे सोहळ्यात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी हे विधान केले. या त्यांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक नगरसेवक असतानाही महापौर म्हणून भाजपचा विरोधी पक्षनेता कसा केला,हे त्य़ांनी यावेळी प्रथमच जाहीरपणे सांगितले. बाबरांना हे पद द्यायचे नव्हते,तर भोसरीतलाच विरोधी पक्षनेता करायचा असल्याने पीठासीन अधिकारी म्हणून हे केले,असे लांडे म्हणाले.

Sanjay Raut and Sharad Pawar
Loksabha Election 2024 : पालघर लोकसभेच्या रिंगणात 'या' संघटनेची एंट्री; समीकरणे बदलणार

खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी गजानन बाबरांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण सांगितली. 2009 ला विलास लांडेंना उमेदवारी दिल्याने बाबरांची आमदारकीची हॅटट्रिक हुकली,असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. तर, मोठ्या मनाचा माणूस असलेल्या बाळासाहेब ठाकरेंमुळे सुप्रिया सुळे या राज्यसभेत बिनविरोध गेल्या होत्या असे ते म्हणाले. बाबरांनी अनेक माणसे तयार केली,असे सांगत त्यांचा उल्लेख त्यांनी संकटमोचक असा केला.

बाबरांनी उद्योगनगरीत प्रथमच सुरु सुरु केलेल्या काळभोरनगर येथील पहिल्या शिवसेना शाखेला बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) भेट दिल्याची आठवण राऊतांनी सांगितली. तर त्यांच्यासारख्या शिवसैनिकांमुळे शिवसेना आज टिकून आहे,असेही ते म्हणाले. तर,बाबरांनी महापौर निवडणुकीत माघार घेतल्याने आपण बिनविरोध निवडून आल्याचे वाघेरेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे-पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे,शिवसेनेचे पिंपरीचे माजी आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार या सोहळ्याला हजर होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Sanjay Raut and Sharad Pawar
Devendra Fadnavis News: जरांगेंनंतर आता ठाकरेंच्या आमदाराचा फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले,'सुरतला असताना मलाही...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com