कुणी काहीही म्हणो; पुणे-पिंपरीत महापौर राष्ट्रवादीचाच

महाविकास आघाडीच्या तीन पक्षात सध्या पुण्यातल्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे.
MVA-Pune
MVA-PuneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : आगामी निवडणुका व त्यानंतर महापौरपदाबाबत कुणी काहीही दावे करीत असले तरी येत्या निवडणुकीनंतर पिंपरी तसेच पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच महापौर होईल,असा विश्‍वास पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षात सध्या पुण्यातल्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. अशावेळी पुण्याचा महापौर आमचाच होईल, असा दावा करीत राहणे दोन्ही कॉंग्रेमधल्या पुण्यातील नेत्यांना खटकत आहे.यावरून ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

MVA-Pune
लाचखोरी प्रकरणात भाजपाचा राज्यस्तरीय पदाधिकारी अटकेत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या पंधरा दिवसात दोनदा पुणे व पिंपरीबाबत विधान केले आहे.या दोन्ही ठिकाणी काहीही झाले तरी महापौर शिवसेनेचा होणार असल्याचे खासदार राऊत म्हणत आहेत.या पाश्‍र्वभूमीवर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘ कुणी काहीही म्हणो, प्रत्येकाला आपापल्या पक्षाबद्दल बोलण्याचा आधिकार आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुणे व पिंपरीतील ताकद सर्वांना माहिती आहे. ही ताकद आगामी काळात आणखी वाढणार असल्याने या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा महापौर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.’’

पुण्यात भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाीच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. या संदर्भात या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. या पाश्‍र्वभूमीवर खासदार राऊत यांनी दोनवेळा केलेले विधान व त्यावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया यामधून महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

MVA-Pune
मित्रांनीच केला घात : पुण्यात संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात गोळी घालून खून

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहे. मागील दहा वर्षे कॉंग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी सत्तेत होती. सध्याच्या महापालिकेत पक्षाचे ४२ नगरसेवक आहेत. या तुलनेत शिवसेनेचे पुण्यात फक्त दहा नगरसेवक आहेत. पक्षाची ताकद मर्यादीत आहे. तरीही खासदार कशाचा आधारावर शिवसेनेचा महापौर होणार असे सांगत आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षात सध्या पुण्यातल्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. अशावेळी पुण्याचा महापौर आमचाच होईल, असा दावा करीत राहणे दोन्ही कॉंग्रेमधल्या पुण्यातील नेत्यांना खटकत आहे.यावरून ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com