Someshwar Election News: सोमेश्वर कारखाना निवडणूक; अखेर युगेंद्र पवारांची धडाक्यात एन्ट्री, इच्छुकांच्या मुलाखती घेत दिले मोठे संकेत

Someshwar Sugar Factory Election 2026 : बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार ’अशी थेट राजकीय लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे संजय जगताप, तर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी स्वबळावर ही निवडणूक लढण्याचा नारा दिल्यानं निवडणुकीचं गणित आणखी गुंतागुंतीचं झालं आहे.
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा राज्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो.या कारखान्याची निवडणुकही राज्यभर चर्चेचा विषय ठरते. मात्र,.यंदाची निवडणूक पॅनेल विरुद्ध पॅनेल अशी न राहता गावा-गावातील स्थानिक समीकरणांनी अतिशय चुरशीची होणार आहे.आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांची अखेर एन्ट्री झाली आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा केवळ सहकाराची निवडणूक न राहता बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण करणारी ठरण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शेतकरी पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. याच निवडणुकीसाठी युगेंद्र पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,सोमेश्वरच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मुलाखतींसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच गटांमध्ये 130 ते 140 अर्ज आमच्या पक्षाकडे आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो.आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत.जे उमेदवार कारखान्याचे हित पाहतील, त्यांना संधी दिली जाईल. सध्या तरी आम्ही स्वतंत्र पॅनल उभे करत आहोत. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही स्वबळावर शेतकरी पॅनल उभे करत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Someshwar Sugar Factory
Shivsena UBT: ठाकरेंच्या नगरसेवकांचं नेमकं चाललंय तरी काय? निवडून आले 'मशाल' चिन्हावर अन् उपस्थिती 'काँग्रेस'च्या स्टेजवर

युगेंद्र पवार म्हणाले,आम्ही एकदा माळेगाव कारखान्यासाठी प्रस्ताव दिला होता. भाजपही स्वतंत्र पॅनल टाकत आहे.दोन्ही शिवसेना गटही पॅनल टाकत आहेत. शरद पवार यांचं म्हणणं आहे की,सहकारामध्ये आपण राजकारण केले नाही पाहिजे. शेवटी हा प्रपंचाचा प्रश्न आहे. कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे.चांगले,उच्चशिक्षित लोक आपण निवडून दिले पाहिजेत,अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

माळेगाव कारखाना निवडणुकीच्या वेळी ‘तुमचे उमेदवार घेतो’ असे सांगण्यात आले होते; मात्र तसे झाले नाही.तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.ही सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आहे.प्रचारासाठी सगळे येतील आणि सगळे आम्हाला मदत करतील.

Someshwar Sugar Factory
BJP Vs Shivsena: भाजपकडून ‘बुद्धीजीवी प्रकोष्ठ’ची नियुक्ती: बार्किंग ब्रिगेड, टॅटूधारी बायका, अडाणटप्पू...म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपला डिवचलं

सहकारामध्ये सगळे सभासद एकत्र येतात.खासदार सुप्रिया सुळे येथे लक्ष घालतील. शरद पवार यांना विनंती करणार आहे. रोहित पवारही लक्ष घालतील. सगळे आम्हाला ताकद देतील. युगेंद्र पवार हा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार ’अशी थेट राजकीय लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे संजय जगताप, तर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी स्वबळावर ही निवडणूक लढण्याचा नारा दिल्यानं निवडणुकीचं गणित आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. दोन्ही शिवसेनाही मैदानात उतरणार असल्यानं मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com